घपला होताच सरकार सावध, लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची आता कसून तपासणी होणार

पुणे: राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचीच(yojna) चर्चा सर्वत्र दिसून येत आहे, अशातच या योजनेच्या बाबतीत काही गैरप्रकार होत असल्याचं देखील समोर आलं आहे. काही पुरूषांनी महिलांच्या नावे आपले अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. तर काही ठिकाणी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बायकोचे 26 अर्ज दाखल केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी(yojna) आता महिला व बालविकास विभागाकडून मुदत वाढवलेल्या चालू महिन्यात म्हणजेत सप्टेंबर महिन्यामध्ये भरल्या जाणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करता येईल का जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल असा विचार देखील सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यात अनेक बनावट अर्ज भरल्याचे निर्दशनास आल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचबरोबर अर्जाबाबत होणारे गैरप्रकर आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागाकडून देण्यात आलेला आहे.

सातारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकाच महिलेने वेगवेगळ्या प्रकारे अनेक अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील एका महिलेच्या नावे वेगवेगळ्या आधार क्रमांकाद्वारे सुमारे 30 अर्ज दाखल केल्याचा धक्कादायर प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यानंतर विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार विभागाने संबंधिताच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

आता राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठीची राज्य सरकारने ताराख वाढवून दिली आहे. योजनेचा अर्ज करण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदत वाढविली आहे. चालू सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे चौकशी काटेकोर केली जाणार आहे, अशी माहितीही यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

साताऱ्यातील घटनेबाबात माहिती देताता नारनवरे म्हणाले, साताऱ्यातील एका महिलेने अनेकदा बनावट अर्ज दाखल करून सरकारची फसवणूक केली आहे. अर्ज तपासण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये आणखी काही बदल करता येईल का, याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. आता येणाऱ्या प्रत्येक अर्जाची छाननी केली जाईल. ते तपासले जातील, आधार क्रमांक कोणत्या बँकेशी लिंक आहे, याचीही चौकशी केली जाणार आहे. तालुका, जिल्हा तसेच जिल्हा प्रशासनाकडून अर्जाची पुन्हा तपासणी करण्याशिवाय आणखी काही निकषांद्वारे अर्जाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

एका पठ्ठ्यानं आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 26 फॉर्म भरले आहेत. ह घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. गणेश घाडगे असं या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी फसवणुकीच्या आरोपाखाली पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. खारघरमध्ये राहणाऱ्या पूजा महामुनीचा फॉर्म पुन्हा फेटाळला जात असताना फसवणुकीचे प्रकरण समोर आले. यानंतर भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी याबाबत तक्रार केली होती. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातारा येथील गणेश घाडगे या व्यक्तीने संपूर्ण नियोजन करून त्याची पत्नी प्रतीक्षा पोपट जाधव उर्फ ​​प्रतीक्षा गणेश गावडे हिच्या नावे 26 फॉर्म भरले. लाडली बहिण योजनेचे फॉर्म भरताना नातेवाइकांना न कळवता त्यांचे आधारकार्ड वापरुन फसवणूक केली.

हेही वाचा:

मोठी बातमी! कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

निवडणुकीआधीच भाजपला मोठे झटके; यादी जाहीर होताच राजीनाम्याची लाट

एकमेकींच्या झिंज्या उपटत तरुणींचे जोरदार भांडण : Video Viral