होळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गूडन्यूज, महागाई भत्ता वाढणार

केंद्र सरकार होळीआधी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते. जर सरकारने होळीपूर्वी घोषणा केली, तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा(employees) पगार वाढेल आणि पेन्शनधारकांचाही फायदा होईल. महागाई भत्त्यात वाढ झाल्यास १.२ कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.

महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवण्याची परंपरा

केंद्र सरकार कर्मचारी (employees) आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून दोनवेळा वाढ करते. ही वाढ जानेवारी आणि जुलै महिन्यात केली जाते. आता होळीपूर्वी जी वाढ केली जाणार आहे ती जानेवारीपासून लागू होईल. याआधीही मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती.

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ५ मार्चला झाली. या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याबाबत चर्चा झाली. गेल्या वेळी महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला गेला होता. यंदाही तितकीच वाढ अपेक्षित आहे. होळीपूर्वी याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

संभाव्य वाढीबाबत तर्कवितर्क

मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी महागाई भत्ता ३ टक्के वाढवला होता. यंदा किती वाढ होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २ टक्के वाढ केली जाईल अशी चर्चा आहे, मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसंच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी ८वा वेतन आयोग लागू करण्याचाही विचार सुरू आहे.

हेही वाचा :

आयपीएलपूर्वी स्टार क्रिकेटरने दिली गोड बातमी

अरे बापरे! आईस्क्रीममध्ये आढळला चक्क साप, लोकांच्या जीवाशी खेळ, PHOTOS व्हायरल

 गृहिणींना दिलासा, बाजारात लसूणच्या किंमतीत घट