कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शासकीय रुग्णालयांमध्ये(hospitals) सर्व प्रकारच्या आजारावर उपचार केले जातात. त्यासाठी आजार निहाय विभागही असतात. त्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे, महागडी यंत्रे उपलब्ध करून दिली जातात. उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलेल्या रुग्णाला विविध प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी बाहेर जायला लागू नये इतकी सुसज्ज यंत्रणा अनेक शासकीय रुग्णालयामध्ये असते.

ज्या त्या विभागासाठी पारंगत वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगल्या वेतनावर नियुक्त केले जाते. विभागनिहाय मानद वैद्यकीय अधिकारी ही नेमले जातात. कायमसेवेतील आणि मानद सेवेतील काही जणांच्या मोठ्या महत्त्वकांक्षा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी ही मंडळी रुग्णालयातील महत्त्वाचे विभाग”आजारी”पाडतात. शासकीय रुग्णालये आजारी पाडण्याचे उद्योग जोपर्यंत बंद पडत नाहीत तोपर्यंत”दीनानाथ”सारख्यांची दुकानदारी चालूच राहणार आहे.
दिग्विजय खानविलकर हे आरोग्य मंत्री होते तेव्हा त्यांनी सीपीआर रुग्णालय हे आपले दुसरे घर मानले होते. त्यांच्या कारकिर्दीत हे शासकीय रुग्णालय(hospitals) सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जात होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्य सेवेत ज्या कंपनीची भिंतीलेटर मशीन असतात त्याच कंपनीची 18 व्हेंटिलेटर मशीन्स त्यांनी सीपीआर रुग्णालयासाठी खरेदी केली होती. वर्षभरातच ही मशीन नादुरुस्त झाली किंवा ती मुद्दाम बंद पाडण्यात आली. सिटीस्कॅन, डायलिसिस यंत्रणा इथे होती पण ती नादुरुस्त केली गेली. रुग्णांना खाजगी सेवेचा आधार घ्यावा लागला. खाजगी क्षेत्रातील या सुविधा देणारी यंत्रे मात्र कधीही नादुरुस्त झाली नाहीत किंवा होत नाहीत.
सीपीआर रुग्णालयात(hospitals) राजा या शस्त्रक्रिया विभाग सुरू करणे हे श्री खाणविलकरांचे स्वप्न होते. त्यांनी ते वास्तवात आणले. पण हा विभागही अधून मधून आजारी पडला जाऊन लागला आहे. या विभागाच्या हृदयाची स्पंदने कधी चालू असतात तर कधी मंद असतात. सीपीआर रुग्णालय हे जिल्हाल रुग्णालय नव्हे तर सध्या प्रादेशिक रुग्णालय बनले आहे.
इथे सध्या बऱ्यापैकी सोयी सुविधा असल्या तरी रुग्णाला किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना वशिल्याचा “स्टेथेस्कोप”लावावा लागतो. याच रुग्णालयात एकेकाळी शासन सेवेत तसेच मानद सेवेत असणाऱ्यांची मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सध्या कोल्हापुरात आहेत आणि तिथे डिपॉझिट पद्धत आहे. रुग्णाला दाखल करून घेताना “इतके पैसे काउंटर वर जमा करा”असे सांगितले जाते.

रुग्णांच्या नातेवाईकांच्याकडून डिपॉझिट जमा झाल्याची खात्री करूनच उपचार सुरू केले जातात. उपचार केल्याचे पूर्ण पैसे जमा केले नाहीत म्हणून मृतदेह सुद्धा रुग्णालय प्रशासनाकडून “ओलीस”ठेवले जातात. तशा अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा रुग्णाला व्हेंटिलेटर लावून कृत्रिम रित्या जिवंत ठेवले जाते. रोजचा व्हेंटिलेटर चा खर्च बघून नातेवाईक अगदी हतबल होऊन व्हेंटिलेटर काढायला लावतात. एकूणच खाजगी रुग्णालयांची दुकानदारी सध्या जोरात आणि नफ्यात सुरू आहे.
असे काही आजार आहेत की त्यावर शासकीय रुग्णालयात(hospitals) उपचार किंवा शस्त्रक्रिया होत नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे तज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत, आवश्यक असणारी मशीन्स किंवा उपकरणे नाहीत. म्हणून मग महात्मा फुले आरोग्य योजना काही खाजगी रुग्णालयांना रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचार करण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. पण ह्या योजनेखाली रुग्णांवर उपचार करताना या खाजगी रुग्णालय प्रशासनाची भावना उपकार केल्याची असते. वास्तविक आहे या आरोग्य योजनेवर जेवढा खर्च होतो तेवढाच खर्च शासकीय रुग्णालयांवर केला तर खाजगी रुग्णालयाकडे जाण्याची वेळ सामान्य स्थितीतील रुग्णांवर येणार नाही. पण शासकीय कार्यालयातील वैद्यकीय व्यवस्थेला कार्यप्रवण (मोटिवेट) करावे लागेल. पण त्याचीच तर कमतरता आहे.
शासकीय रुग्णालयात बऱ्यापैकी उपलब्ध असलेल्या उपकरणांचा यंत्रांचा प्रभावी वापर केला तर, रुग्णांना अजिबात काळजी करू नका असा विश्वास दिला तर, आणि शासकीय रुग्णालयात उपचार करणे म्हणजे “कमी”पणाचे ही मानसिकता सोडून दिली तर खाजगी रुग्णालयांची दुकानदारी बऱ्यापैकी कमी होऊ शकते. खाजगी रुग्णालयांबद्दल दहा जणांना रस्त्यात गाठून प्रतिक्रिया विचारली तर, दहापैकी नऊ जण”सत्तुर”हा शब्दप्रयोग वापरताना दिसतील.
सध्या वादग्रस्त बनलेल्या पुणे येथील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर हे त्यांनीच सांगितल्याप्रमाणे प्रतिदिनी दहा शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रिया झालेला एक रुग्ण सात दिवस अतिदक्षता विभागात आणि चार दिवस सर्वसाधारण विभागात असतो. प्रत्येक रुग्णाला त्याच्या बेड जवळ जाऊन चौकशी करायची, बेडवर अडकवून ठेवलेला तक्ता वाचायचा याला त्यांच्या भाषेत व्हिजिट म्हटले जाते. त्यांची ही व्हिजिट फी प्रती रुग्ण सहाशे रुपये आहे. म्हणजे अकरा दिवसांची व्हिजिट फी म्हणून त्यांना 66 हजार रुपये मिळतात. इतर शुल्क वेगळे. म्हणजे त्यांची दुकानदारी किती हे लक्षात यावे.
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये(hospitals) आयसीयू मध्ये तसेच जनरल वार्ड मध्ये नर्सिंग स्टेशन असते. त्याचे सुद्धा स्वतंत्र शुल्क घेतले जाते. दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय धर्मादाय कायद्याखाली नोंदणीकृत आहे. नियमाप्रमाणे एकूण बेड पैकी दहा टक्के बेड हे सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी आरक्षित ठेवावे लागतात आणि अशा रुग्णांवर नाममात्र शुल्क घेऊन उपचार करावे लागतात. गेल्या पंचवीस वर्षात या रुग्णालयाच्या विश्वस्तांनी किती गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार केले आहेत याची यादी जाहीर करणे आवश्यक आहे पण तसे ते करत नाहीत, आणि ज्यांना या विश्वस्तांना जाब विचारण्याचे अधिकार आहेत ते लोक आपले अधिकार वापरत नाहीत. म्हणूनच शासकीय रुग्णालये कोमात आणि खाजगी रुग्णालय जोमात असे विदारक चित्र महाराष्ट्रातील पुण्यातच नव्हे तर इतर महानगरातही पाहायला मिळते.
हेही वाचा :
उन्हाळ्यात उष्मघाताच्या समस्या होऊ नये म्हणून ‘ही’ ड्रिंक ठरेल फायदेशीर….
“मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन शूट करताना अस्वस्थ झाली ‘ही’अभिनेत्री!