जगभरात कॅन्सर आणि मधुमेहाच्या रुग्ण(patients) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. याशिवाय कॅन्सर सारख्या धोका आजाराचे निदान झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडून जाते. २०० पेक्षा जास्त अवयवांना कॅन्सर होण्याची शक्यता असते. यासोबतच मधुमेह हा आजार सुद्धा चर्चेचा विषय झाला आहे.

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढ जाते. योग्य वेळी औषध उपचार न केल्यास शरीरातील इतर अवयवांनासुद्धा गंभीर आजार होऊन अवयव निकामी होऊन जातात.
मधुमेह किंवा कॅन्सर हे दीर्घकाळ शरीरात दिसून येणारे आजार आहेत(patients). या आजारांचे निदान झाल्यानंतर वर्षानुवर्षे डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. मात्र आता मधुमेह आणि कॅन्सरच्या गोळ्या औषधांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. या औषधांच्या किमतींमध्ये 1.7 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये दर वाढीचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर दिसून येणार नाही. मात्र येणाऱ्या 3 महिन्यांनंतर दरवाढ जाणवण्याची शक्यता आहे. कारण तीन महिन्यांचा साठा केंद्राकडे उपलब्ध आहे.

वाढलेल्या महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे बजेट कोलमडून गेले आहे. मात्र पुन्हा एकदा गोळ्या औषधांच्या किमितीं वाढ होणार असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे सरचिटणीस राजीव सिंघल यांनी सांगितल्यानुसार कॅन्सर आणि मधुमेहाच्या औषधांच्या किमितींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे औषध उद्योगाला दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय र्मा उद्योगात कच्च्या मालाची किंमत आणि औषध बनवण्याचा इतर खर्च वाढत असल्यामुळे औषधांच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 जीवनरक्षक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली आहे. कॅन्सर हा एक गंभीर आणि दुर्मिळ आजार आहे. या आजाराचे निदान झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये बदल होऊ लागतात. त्यामुळे कॅन्सर आणि इतर आजारांच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी औषधांच्या किमतींवर कस्टम ड्यूटी पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
हेही वाचा :
कडक उन्हाळ्यात वाढू शकतो ‘या’ भयानक आजारांचा धोका!
एक चूक अन् खेळ खल्लास! ‘त्या’ चुकीमुळे एस्केलेटरमध्ये तरुणाचं डोकं अडकलं अन्…; VIDEO पाहून उडेल थरकाप
होय, एक दिवस नक्कीच हद्द वाढ होणार आहे……!