नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी भारताच्या विविधतेतील एकतेच्या मूल्याचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. असम विधानसभा (political)मुस्लीम आमदारांना नमाज अदा करण्यासाठी दिलेल्या दोन तासांच्या सवलतीच्या निर्णयावरून राजकीय वादंग उडाल्यामुळे अब्दुल्ला यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
त्यांनी सांगितले की, “भारत हा विविधतेतील एकतेसाठी ओळखला जातो, आणि म्हणूनच प्रत्येक धर्माचे रक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे.”
अब्दुल्ला म्हणाले की, कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते आणि वेळेनुसार गोष्टी बदलतात. त्यांनी प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी असल्याचे मान्य करत, विविध धर्मांचे रक्षण करण्याचे महत्त्व लक्षात आणून दिले.
याचबरोबर, भाजपच्या दोन नेत्यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तिकीट वाटपावरून नाराज असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असून, सांबा जिल्हाध्यक्ष काश्मीर सिंह यांनी भाजपमध्ये असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्यांना उमेदवारी दिल्यामुळे राजीनामा दिला आहे.
हेही वाचा:
‘रील्स’ पाहण्याची लहानशी आदत होऊ शकते गंभीर आजार: तज्ज्ञांचा इशारा
अजित पवारांची युवक पदाधिकाऱ्यांना तंबी: विधानसभा निवडणुकीसाठी हलगर्जी नको…
रोजच्या आहारात समाविष्ट करा हे ३ प्रभावी ड्रिंक्स “फॅटी लिव्हरच्या त्रासापासून आराम..