लाडक्या बहिणींना सरकारचा पुन्हा मोठा दिलासा!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी एक महत्वाची मोठी अपडेट समोर येत आहे. या योजनेसाठी (goverment scheme)अर्ज करण्याची अखेरची तारीख ही ३१ ऑगस्ट होती मात्र अद्यापही अनेक महिला अर्ज दाखल करत आहेत . काही भागांमध्ये महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेकदा प्रयत्न करून देखील असंख्य महिलांना अर्ज दाखल करता आलेला नाहीये. या सर्व गोष्टींची दखल घेत राज्य सरकारने या योजनेचा अर्ज भरण्याच अखेरची मुदत एक महिन्याने वाढवली आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

माझी लाडकी बहिन योजनेची(goverment scheme) नोंदणी सप्टेंबर महिन्यात देखील सुरू राहाणार आहे. याचा अर्थ असा की ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना आता आणखी एक संधी मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. योजना सुरू झाल्यानंतर सर्वत्र योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. मुदतीच्या अखेरच्या दिवशी देखील अर्ज करण्यासाठी महिलांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले .

दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, “महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार. योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.”

आदिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शासन निर्णयाचे पत्रक देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२४ मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा:

ठरलं तर! ‘या’ दिवशी रोहित शर्मा उचलणार WTC ची गदा

मोठी बातमी! बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; विधानसभेत विधेयक मंजूर

धावत्या ट्रेनसोबत सेल्फीचा नाद तरुणीला पडला महागात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप