सध्याच्या घडीला टोमॅटोचे(tomato) भाव गगनाला भिडले आहेत. पंधरवड्यापूर्वी 40 ते 50 रुपये किलोने मिळणारा टोमॅटो सध्या बाजारात 120 ते 130 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. हायब्रीड टोमॅटोही 100 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. हे पाहता सरकारनेच टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू केली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज येथील संसद भवनाजवळ स्वस्त टोमॅटोच्या विक्री सुरु करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे.
नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन (एनसीसीएफ) या केंद्रीय ग्राहक व्यवहार प्राधिकरणाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या संस्थेने सोमवारी (ता.७) मिनी ट्रक किंवा टेम्पोद्वारे स्वस्त टोमॅटोची(tomato) विक्री सुरू केली आहे. सरकारी टोमॅटोची दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये सफालच्या आऊटलेट्सद्वारे विक्री केली जात आहे. स्वस्त टोमॅटोचा भाव 65 रुपये प्रति किलो इतका आहे.
केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोच्या घाऊक आणि किरकोळ किमतीत मोठी तफावत दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीचा फायदा घेत, काही व्यापारी चढ्या दराने टोमॅटो विकत आहेत. किरकोळ विक्रेतेही यात सामील झाले आहेत. मग सरकारला टोमॅटो स्वस्तात विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. 65 रुपये किलो दराने हा टोमॅटो विकला तरी सरकारचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
यंदा मान्सूनचा पाऊस जास्त लांबला. त्यामुळे टोमॅटोसह हिरव्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच सणासुदीच्या सुरुवातीपासूनच भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या केवळ टोमॅटोच नाही तर कांदाही ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. यासोबतच भेंडी, पालक, हिरवी मिरची, काकडी यांसारख्या भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज संसद भवनाजवळील कृषी मंत्रालयात स्वस्त टोमॅटोच्या विक्रीचा शुभारंभ केला. यासोबतच टोमॅटोने भरलेले मिनी ट्रकही अन्य काही भागात पाठवण्यात आले. एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आज फक्त सुरुवात केली आहे. उद्यापासून सरकारी टोमॅटो चांगली व्यवस्था केली जाईल. असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:
मला फोन आला अन्…; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
शिवस्मारकाच्या शोधात संभाजी राजे छत्रपती…!
दसऱ्याला भन्नाट फीचर्ससह खरेदी करा ‘ही’ बाईक
राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर चार दिवसातच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात