इचलकरंजीत आज सायंकाळी ‘फन पार्क’चे भव्य उद्घाटन – IPL चे थेट प्रक्षेपणही उपलब्ध!

इचलकरंजी, ४ एप्रिल २०२५ – शहरातील खाद्यप्रेमी आणि मनोरंजनाच्या शौकिनांसाठी आनंदाची बातमी! आज सायंकाळी ७ वाजता “फन पार्क” या तात्पुरत्या रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन(inauguration) होणार आहे. चंदूर रोडवरील सूरज गॅस गोडाऊन जवळ हा विशेष कार्यक्रम पार पडणार असून, शहरातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन (inauguration)सोहळ्याला माजी आमदार प्रकाश अण्णा आवाडे, आमदार राहुलजी आवाडे (साहेब), घोडावत ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन संजयजी घोडावत, जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संजय-पाटील यड्रावकर, चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन अण्णासाहेबजी चकोते आणि बिग बॉस फेम अभिनेता धनंजयजी पवार (DP) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

क्रिकेटप्रेमींसाठी खास आनंदाची बातमी! “फन पार्क”मध्ये दररोज IPL सामने थेट प्रक्षेपणासह पाहण्याची खास सोय करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना उत्तम जेवणाचा आस्वाद घेत IPL चा रोमांचक आनंद घेता येणार आहे.

“फन पार्क”मध्ये अमर्यादित खाद्यपदार्थ, संगीत आणि मनोरंजनाची विशेष व्यवस्था असणार आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी हा एक वेगळा आणि अनोखा अनुभव ठरणार आहे.

शहरातील नागरिक आणि खाद्यप्रेमींमध्ये या भव्य उद्घाटन सोहळ्याबाबत मोठी उत्सुकता असून, आज सायंकाळी हा रंगारंग सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.

हेही वाचा :

सोनं होणार स्वस्त? ५७ हजारांवर येणार भाव, गुंतवणूकदारांना अच्छे दिन?

विधेयक संसदेत मंजूर बाहेरच जास्त चर्चा….!

उद्योजकांना अनुदान मिळवून देण्यासाठी उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; आ. राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने उद्योजकांना दिलासा