महायुतीच्या शपथविधीचा (political)मुहूर्त ठरला असून येत्या 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचं नाव अद्याप जाहीर केलं नसलं तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
मुंबईतील(political) आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावरती 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी साधारणतः 30 ते 40 हजार लोक अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने आझाद मैदानात एकुण 3 स्टेज असणार आहे.
मुख्य स्टेज हा 60 बाय 100 बाय ८ फुट असणार आहे. या मंचावर पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री असतील. तर उजव्या बाजूला 80 बाय 50 बाय 7 फुट लांबीचा मंच असेल. यावर सर्व साधू संत बसतील. तर डाव्या बाजूला 80 बाय 50 बाय 7 फुटाचा एक स्टेज असेल. या मंचावर छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असेल आणि साऊंड सिस्टीम या ठिकाणी असणार आहे. मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला खासदार आणि आमदार यांची बसण्याची व्यवस्था केली आहा. त्यासाठी 400 खुर्च्या असणार आहे. बाजूला आणि मुख्य मंचाच्या समोर VVIP यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 1000 खुर्ची या ठिकाणी असणार आहे.
डाव्या बाजूला महायुतीमधील मुख्य पदाधिकारी यांच्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तर कार्यकर्त्यांसाठी सात विभागात बसण्याची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. संपुर्ण मंचाचा बाजूला 6 बाय 16 उंचीचे कटआउट लावले जातील. कार्यकर्ते यांच्यासाठी एकुण तीन प्रवेशद्वार असणार आहे. मुंबई महापालिका समोर हे प्रवेशद्वार असणार आहे. व्हीआयपी यांच्यासाठी एकुण तीन प्रवेशद्वार असतील. फॅशन स्ट्रीट कडून व्हीआयपीनी प्रवेश दिला जाईल.
अमित शाह(political) यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल, तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं?, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता?, महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला?, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का?, या मुद्यांचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावलं आहे.
महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचे महानियोजन
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास ४० हजार जणांची उपस्थिती असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार
लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण शपथविधीसाठी देण्यात येणार
जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय
१३ विशेष ब्लाॅकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था असणार
तीन स्टेजची उभारणी केली जाणार
एक मुख्य स्टेज आणि दोन त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार
विविध धर्माचे संत-महंत, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थिती लावणार
संत महंतांसाठी वेगळ्या स्टेजची उभारणी केली जाणार
खासदार आणि आमदारांसाठी देखील वेगळी आसन व्यवस्था केली जाणार
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची देखील आसन व्यवस्था वेगळी असणार
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी…
दिलासादायक! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण?
“राजकीय नेत्यांवर नाना पाटेकरांची तीव्र नाराजी: ‘मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही…’”