उन्हाळा जवळ आल्यावर आपल्याला बाजारात मोठ्या प्रमाणात फळे (Grapes)पाहायला मिळतात. त्यापैकीच एक फळ आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे द्राक्षे. भलेही द्राक्षे दिसायला लहान असतात. पण त्याचे अनेक फायदे आहेत. काहींना हिरवी द्राक्षे आवडतात, तर काहींना काळी द्राक्षे जास्त आवडतात. मात्र सर्वांना हा प्रश्न अनेकदा पडतो आणि ते म्हणजे कोणत्या रंगाची द्राक्षे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? चला तर जाणून घेऊया.

हिरव्या रंगाचे फायदे:
हिरव्या रंगाचे द्राक्षे आंबट-गोड चवीचे असते. त्याचे नियमित सेवन शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. वजन कमी करण्यास फायदेशीर: हिरव्या द्राक्षांमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असते. त्यामुळे हिरव्या रंगाच्या द्राक्षांचे नियमित केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत करते.
पोटासाठी फायदेशीर: हिरव्या रंगाच्या द्राक्षांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात, जे पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात.हृदयासाठी चांगले: हिरव्या द्राक्षांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते.मधुमेहाच्या रूग्णांसाठी लाभदायक:(Grapes) हिरव्या द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मधुमेही रुग्णही त्यांचे सेवन करू शकतात.
काळ्या द्राक्षाचे फायदे:
काळ्या द्राक्षांचा रंग जितका गडद असेल तितकेच ते पोषक तत्वांमध्ये अधिक समृद्ध असतात.अँटिऑक्सिडंटने समृद्ध: काळ्या द्राक्षांमध्ये रेसवेराट्रोल नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते, ज्यामुळे त्वचा चमकते आणि वृद्धत्वाची लक्षणे लवकरच कमी होतात.
हृदयासाठी फायदेशीर: काळ्या द्राक्षांमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, (Grapes)ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला हिरव्या रंगांच्या द्राक्ष्यांचे सेवन नियमित करायला पाहिजे. त्यासोबतच, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला हिरव्या रंगांच्या द्राक्ष्यांचे सेवन नियमित करायला पाहिजे. जर तुम्हाला वृद्धत्वविरोधी , हृदयाचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल, तर तुम्हाला नियमित काळ्या रंगाच्या द्राक्ष्यांचे सेवन प्रभावशाली ठरेल.
हेही वाचा :
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील
महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष