सातारा, १५ जुलै – सातारा जिल्ह्यात पर्यावरण (Environment)संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ४३ हजार ५०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
कृषी दिन ते जागतिक निसर्ग संवर्धन दिन या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील १४९६ पैकी १०५ ग्रामपंचायतींनी किमान १०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील ग्रामपंचायती आघाडीवर असून त्यांनी सर्वाधिक १२ हजार ७२२ वृक्षांची लागवड केली आहे.
या मोहिमेअंतर्गत विविध प्रकारच्या फळझाडांची, औषधी वनस्पतींची आणि स्थानिक वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोलाची भूमिका बजावली जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर आगामी काळात जिल्ह्यात अशाच प्रकारच्या वृक्ष लागवड मोहिमा राबविण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.
हेही वाचा :
उपवासाची चटकदार मेजवानी! आता फ्रेंच फ्राईजही उपवासात
लोकसभा निवडणुकीचा पडसाद विधानसभेतही! सत्तांतर शक्यतेचे संकेत
ड्रीम रोलचे आमिष दाखवत आभासी विश्वात फसवणुकीचा डाव