सांगलीत फडणवीस – संंभाजी भिडे यांच्यात ‘गुफ्तगू’; संजयकाकांसाठी फिल्डिंग की…?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला(political action committees) पोहचला आहे. शक्तिप्रदर्शन, आरोप- प्रत्यारोप, बंडखोरी, नाराजीनाट्य यांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.याचवेळी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार हे पायाला भिंगरी लावून प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. याचवेळी सांगलीत एक भेट जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे(political action committees) हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा अडचणीत येत असतात.पण भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (ता.18) सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली.या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सांगली दौऱ्यासाठी हेलिकॉप्टराने कवलापूर विमानतळावर पोहचले.याचवेळी विमानतळावर भिडे देखील त्याठिकाणी उपस्थित होते.हेलिकॉप्टरमधून फडणवीस उतरताच भिडेंनी त्यांची गाठ घेतली.यानंतर दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाली.

देवेंद्र फडणवीसांचा हात धरून भिडेंनी त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर फडणवीसांनी देखील भिडेंशी कानगोष्टी केल्या. मात्र, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. काय चर्चा झाली असेल यावरुन उलटसुलट चर्चा झडू लागल्या आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी संजयकाका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी संजयकाकांच्या विजयाचा दावा केला. ते म्हणाले, सांगलीत संजयकाका पाटील यांची हॅटट्रिक पक्की आहे.आता ते किती मोठ्या मताधिक्याने विजय मिळवतात,हे बघायचं आहे.

विरोधकांमध्ये सगळी इंजिनं आहेत, आमच्याकडे सगळे डबे आहेत.इंजिनांमध्ये ताळमेळ नसल्याने ती हलत नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच संजयकाका मोदींच्या इंजिनच्या डब्यासोबत सर्वांना दिल्लीला घेऊन चालले आहेत अशी मिश्किल टिप्पणीही फडणवीसांनी आपल्या भाषणात केली आहे.

सातारा लोकसभेसाठी भाजप उमेदवार उदयनराजे यांनी आपला अर्ज दाखल केला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra modi यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय सातारकरांनी केला आहे. त्यामुळेच इतकी प्रचंड गर्दी आज झाली असून उदयनराजे भोसले हे प्रचंड मतांनी निवडून येतील. सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार आमदार असून दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीची प्रचंड ताकदीची आहे. त्यामुळे उदयनराजे प्रचंड ताकदीने विजयी होतील. आजचे शक्ती प्रदर्शन हा ट्रेलर सर्वांनी बघितला आहे. आता पिक्चर मतदानादिवशी बघा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

हेही वाचा :

मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास कोणते शेअर्स करतील मालामाल? 

मुंबईत मुस्लिम मतदारांचा कल कोणाकडे? जाणून घ्या समीकरण

महायुतीला धक्क्यावर धक्के; शिंदे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा