महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची मतदान(dummy) होत आहे. मुंबईत सहा जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन करत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. भांडूप येथील मतदानकेंद्रावर हा प्रकार घडला.
याप्रकरणी संजय राऊत यांनी पोलिसांना(dummy) जाब विचारला आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत आणि सुनिल राऊत मतदानासाठी बाहेर पडले, यावेळी कार्यकर्त्यांना अटक झाल्याचे पाहून संजय राऊत संतापले.
यावेळी सुनील राऊत यांनी देखील पोलिसांना जाब विचारला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत बसवले आहे. आमचे कार्यकर्ते १०० मीटरच्या बाहेर होते. आमच्या टेबलवर मार्गदर्शन करत होते. ही दडपशाही सुरु आहे. या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही. भाजपला माहिती आहे ते जिंकणार आहेत. त्यामुळे पोलिसांचा वापर करुन दबाव निर्माण केल्या जात आहे, असे सुनिल राऊत यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे भाजपच्या तिकीटावर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कपिल पाटील हे भिवंडी मतदारसंघातून भाजपचे प्रमुख उमेदवार आहेत.
भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनाही उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
हेही वाचा :
मनातील भीती काढण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
अकायच्या जन्मानंतर बदलला अनुष्का शर्माचा लूक; घायाळ करणारे सौंदर्य