‘हा’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ‘बिग बॉस 18’मध्ये सलमान खानची घेणार जागा?

‘अनुपमा’ या हिट टीव्ही शोमध्ये वनराजच्या भूमिकेत लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता(actor) सुधांशू पांडे आता या शोचा भाग नाही. जेव्हापासून त्याने शोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली तेव्हापासून तो चर्चेत आहे. आता वनराजच्या भूमिकेत दुस-याचाच चेहरा पाहावा लागेल, हे चाहत्यांना सहन होत नाही. सुधांशूने शो सोडण्याची विविध कारणे समोर आली, त्यापैकी एक बिग बॉसमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुधांशू पांडेने (actor) शो सोडण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. त्याचे निर्माते राजन शाही यांच्यासोबत मतभेद झाल्याची चर्चा होती. तसेच त्याचे को-स्टार रुपाली गांगुलीसोबत जमले नाही, असेही बोलले जात होते. याशिवाय आणखी एक कारण समोर आले आहे की, सुधांशूला ‘बिग बॉस 18’ ऑफर करण्यात आली आहे. सुधांशूने पहिल्या दोन कारणांबद्दल आधीच सांगितले आहे आणि आता त्याने तिसऱ्या कारणाबद्दलही सत्य सांगितले आहे. तसेच वनराजच्या भूमिकेत तो का दिसणार नाही हे देखील अभिनेत्याने स्पष्ट केले आहे.

फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सुधांशू म्हणाला, “वनराज ही माझी व्यक्तिरेखा एका त्रासदायक व्यक्तीसारखी होती. गौरव खन्नाच्या एन्ट्रीनंतर शोमध्ये रोमँटिक अँगलची ओळख झाली, पण माझ्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही. केवळ रोमान्सवर शो चालू शकत नाही. ते यशस्वी होण्यासाठी त्यात नाट्य असायला हवे. अनुपमा या शोमध्ये वनराज हा एक मजबूत खांब्यासारखा होता, पण त्याच्यावर योग्य प्रयोग झाला नाही.’ असे अभिनेत्याने सांगितले.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सुधांशूने बिग बॉसमध्ये सहभागी होण्यात अजिबात रस नसल्याचेही स्पष्ट केले होते. जर देवाची इच्छा असेल तर तो नक्कीच हा शो होस्ट करेल असे तो म्हणाला. तसेच होस्टिंग माझे पहिले प्राधान्य आहे असे देखील त्याने सांगितले.

हेही वाचा:

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; 17 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

गर्लफ्रेंडवर आरोप करीत तरुणाची आत्महत्या; “मी मुलगा, माझं कोण ऐकणार…!”

गौतमी पाटील कोणासोबत नाचत नाही, मात्र ती माझ्यासोबत नाचली” – भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा खुलासा