900 रुपयांच्या ड्रेससाठी भरावे लागले एक लाख! रिफंड लिंकवर क्लिक करताच घडला प्रकार

ऑनलाइन शॉपिंग(Online shopping) करणे वर्ध्यातील एका महिलेला महागात पडले असून 997 रुपयांचा ड्रेस तिला लाखाला पडला. ऑनलाईन साईटवरून मागवलेला ड्रेस आवडला नसल्याने परत करून रिफंड मिळण्यासाठी एपीके फाइल ओपन करताच महिलेच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये गायब झाले. महिलेने याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वर्ध्याच्या म्हसाळा येथे राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन (Online shopping)साइटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र, तो ड्रेस आवडला नसल्याने तिने परत केला. याचे रिफंड त्या महिलेला आले नाही. महिलेने कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यास सांगितले.

महिलेने व्हॉट्सॲपवर संपर्क केला असता त्यांनी गुगल पे, फोन पे क्रमांक, तसेच पिनकोड मागितला. महिलेने ते दिले असता तिच्या व्हॉट्सॲपवर एपीके फाइल पाठवून डाउनलोड करण्यास सांगितले. फाइल डाउनलोड करताच तिच्या बँक खात्यातून 85 हजार आणि 15 हजार असे एकूण 1 लाख रुपयांची लूट करण्यात झाली. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने याबाबतची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सध्या ऑनलाईन मार्केटिंगचा क्रेज वाढली आहे. ऑनलाईन मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या वेब साईटच्या माध्यमातून खरेदी केली जातं आहे. मात्र अशातच या माध्यमातून सायबर भामटे सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात. या सायबर भामट्यांच्या जाळ्यात आता सुशिक्षित लोकसुद्धा अडकत आहेत आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी नागरिक त्यांच्या जाळ्यात फसत आहेत. यामुळे आता नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा :

सौरव गांगुलीच्या लग्नावर संकट: विवाहित पुरुषांवर प्रेम करणारी टॉप अभिनेत्री आता का झाली गायब

मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा

श्रद्धा कपूरचं वरुण धवनला प्रपोज, नकारानंतर घेतलं धक्कादायक पाऊल!