कोल्हापूर : शहर हद्दवाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना काळे झेंड दाखवण्यापेक्षा काँग्रेसच्या(minister) शहराध्यक्षांनी पंधरा वर्षे आमदार आणि आठ वर्षे मंत्री असणाऱ्या त्यांच्या नेत्यांना (सतेज पाटील) कधी काळे झेंडे दाखवले आहेत का? महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हद्दवाढ का केली नाही? पंधरा वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीने कोल्हापूरसाठी काहीही केले नाही, असा आरोप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केला.
आमदार सतेज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातील(minister) त्यांना मानणाऱ्या आणि हद्दवाढीत समाविष्ट असणाऱ्या गावांचा हद्दवाढीच्या समर्थनात ठराव घ्यावा, असे जाहीर आव्हानही महाडिक यांनी केले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
महाडिक म्हणाल्या, ‘मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ करण्याची अधिसूचना घेऊन कोल्हापुरात यावे, अशी मागणी हद्दवाढ कृती समितीतर्फे केली जात आहे. याचवेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीची मतेही जाणून घ्यावे. आमदार अमल महाडिक यांनी अमृत योजनेतून ३५० कोटी रुपयांचा निधी आणला. हा निधी महानगरपालिकेने कसा खर्च केला. त्यातून शहराचा कोणता विकास केला, हे सांगावे.
उत्तरमधून कृष्णराज महाडिक यांचे नाव येत आहे. एकाच घरात खासदार आणि आमदार अशी टीका होऊ शकते, या प्रश्नावर महाडिक म्हणाल्या, हे पक्ष, कार्यकर्ते ठरतात. सध्या एकाच घरात दोन आमदार आहेतच, अशी टीका आमदार सतेज पाटील, आमदार ऋुतुराज पाटील यांच्यावर केली. राजारामचे संचालक तानाजी पाटील उपस्थित होते.
हेही वाचा :
मनोज जरांगेंवर गंभीर गुन्हे दाखल करा; अन्यथा आत्मदहन करेन, कुणी दिला इशारा?
इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीवर कारवाई करा अन्यथा उपोषण व आत्मदहनाचा इशारा! Video
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचा सांगली जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा