आणीबाणीचे अर्धशतक! “संविधान हत्या दिन” पाळणार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी देशात(emergency) आणीबाणी जाहीर केली. तो दिवस होता दिनांक 25 जून आणि आता दरवर्षी दिनांक 25 जून हा”संविधान हत्या दिन”म्हणून पाळला जाणार आहे. केंद्र शासनाने हा निर्णय घेतला असून, त्यावर आता देशभर उलट सुलट चर्चेला उधाण येईल. कोणत्याही चर्चे शिवाय, विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात न घेता केंद्र शासनाने हा एकतर्फी निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या गेल्या दहा वर्षाच्या काळात आणीबाणी सदृश्य परिस्थिती होती अशी टीका केलेली आहे.

ममता बॅनर्जी या अंबानी कुटुंबीयांच्या(emergency) मंगल सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी मुंबईत आल्या असून त्यांनी मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि तेथेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्याच काळात संविधान धोक्यात आले आहे असे त्यांनी स्पष्ट केले असून देशातील इतर विरोधी पक्ष नेत्यांची केंद्र शासनाच्या या निर्णयावर कोणती भूमिका असेल याचे संकेत त्यांच्याकडून मिळाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात सतत दोन महिने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून”संविधान धोक्यात आहे, संविधान बदलले जाणार आहे”असे सातत्याने सांगितले जात होते. आणि त्याचा फटका भाजप प्रणित एनडीए आघाडीला बसला होता. महाराष्ट्रातही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी अशाच प्रकारचा प्रचार अतिशय प्रभावीपणे केलेला होता.

इंडिया आघाडीकडून संविधान बदलले जाणार आहे या प्रचाराला प्रभावीपणे उत्तर देण्यासाठी म्हणून पुढील वर्षापासून दिनांक 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. आणीबाणीच्या काळात या देशाचे संविधानच अस्तित्वात नव्हते. लोकशाही नव्हती. आणीबाणीचे पर्व हे या देशाच्या इतिहासातील काळे कुठे पर्व असल्याचे ठामपणे सांगण्यासाठी म्हणून आता संविधान हत्या दिन पाळला जाणार आहे. संविधान हत्या दिन पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने या देशातील काँग्रेस वगळून सर्वच राजकीय पक्षांची एक प्रकारची कोंडी केली आहे.

या संविधान हत्या दिनाला जे कोणी राजकीय पक्ष समर्थन(emergency) देणार नाहीत, ते सर्वच राजकीय पक्ष आपोआप आणीबाणीचे समर्थक म्हणून ओळखले जातील अशा प्रकारची अडचण संविधान हत्या दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे. मुंबईत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी केंद्र शासनाच्या या निर्णयावर दिलेली प्रतिक्रिया ही सावध आहे. कोणाशीही चर्चा न करता केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. असे त्या म्हणतात पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या दहा वर्षांचा कालावधी हा संविधानाची हत्या करणाराच होता, अशीही टीका त्यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेने उद्धव ठाकरे उपस्थित होते पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते.

तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीच्या घटक पक्षाकडून संविधान हत्या दिनाचे जोरदारपणे समर्थन केले जाईल. आणि हा मुद्दा प्रचारात सातत्याने सर्वसामान्य जनतेसमोर मांडला जाईल. त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते. आणि त्यांनी तेव्हा आणीबाणीला विरोध केलेला नव्हता.

भारतीय जनता पक्षाकडून संविधान धोक्यात आहे या इंडिया आघाडीच्या प्रचाराला जोरदार प्रत्युत्तर म्हणून संविधान हत्या दिन पाळला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या विषयावरून राजकीय चर्चेला उधाण येणार आहे. आणि त्याची सुरुवातही झालेली आहे.

हेही वाचा :

काळोख्या रात्री स्मशानात चालू ‘हे’ काम; पोलिसांच्या ताब्यात प्रीयसी-प्रियकर…

गरोदर दीपिकाला पाहून ऐश्वर्या रायच्या डोळ्यात पाणी; मारली घट्ट मिठी

”अरविंद केजरीवाल ‘कोमा’मध्ये जाऊ शकतात”, ‘आप’ नेत्याने केला दावा