बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय(Kolhapur) ते रशियन इरीना रुडाकोव्हाने. बिग बॉसच्या घरात तिने पाऊल ठेवताच सोशल मिडिया स्टार अंकिता वालावलकर हिने तिच्यामुळे एका मराठी स्पर्धकाची जागा गेली असा वक्तव्य केलं होतं. त्यावर रितेशनेही त्याच्या भाऊच्या धक्क्यावरही तिची चांगलीच शाळा घेतली. त्याचप्रमाणे त्याने इरीनाच्या मराठीपणाचंही भरभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.
इरीना घरात आल्यापासून तिचं आणि मराठीचं असलेलं नातं प्रेक्षकांना(Kolhapur) फार भावत आहे. तिचा मराठी बोलण्याचा प्रयत्न, तुपासाठी भांडणं, पुरणपोळी बनवण्याचा हट्ट,एकादशीचे उपवास असोत, या सगळ्याचं मराठी प्रेक्षकांनाही फार अप्रुप वाटतंय. त्यामुळे इरीनाच्या मराठीपणाचं भरभरुन कौतुक केलं जात असल्याचं चित्र आहे. त्यातच तिला मराठीचे धडे देण्यासाठी धनंजयचे सुरु असलेले प्रयत्नही साऱ्यांचं मन जिंकत आहेत.
रितेशच्या भाऊच्या धक्क्यावर धनंजय इरीनाला मराठीचे धडे देत असल्याचं पाहायला मिळालं. पछाडलेला सिनेमातील रुपानं देखणी या गाण्यावर धनंजयने इरीनाला डान्स करायला शिकावलं. सध्या सोशल मीडियावर यासगळ्याची जोरदार चर्चा सुरु होत असल्याचं पाहायला मिळतंय. इरीना देखील मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
अंकिताने जेव्हा इरीनाविषयी वक्तव्य केलं त्यावर, सध्या बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त मराठीपण जपणारी कुणी व्यक्ती असेल तर ती इरीना आहे. त्याचप्रमाणे इरीने भाऊच्या धक्क्यासाठी केलेल्या लूकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा :
सत्ता ठेवायची आहे मुठीत असलं राजकारण गेलं चुलीत
मुख्याध्यापिका अन् सहाय्यक शिक्षिकेत फ्री स्टाईल हाणामारी Video Viral
शेतकऱ्यांना दिलासा! पिकांच्या नुकसानीपोटी मिळणार 596 कोटी रुपये