आज 15 ऑगस्टरोजी स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरात(gold) अनेक ठिकाणी आज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व देशवासीयांच्या मनात आज देशभक्ती संचारली आहे. अशात सोने-चांदीने देखील आनंदवार्ता दिली आहे. या राष्ट्रीय सणाला सोने-चांदीचे भाव घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
गेल्या स्वातंत्र्य दिनी या दोन्ही धातूंचा जो भाव होता, त्यापेक्षा किंमती इतक्या वधारल्या आहेत. आज 15 ऑगस्ट रोजीच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,760 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. तर यावेळी हाच भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
तर, 22 कॅरेट सोने(gold) 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत आज 22 कॅरेट सोने 10,900 रुपयांनी वाढले आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 11,900 रुपयांनी वधारला आहे.
गेल्यावर्षी चांदीचे भाव हे 72,800 रुपये किलो होते. आज एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे. म्हणजे किलोमागे चांदी 10,200 रुपयांनी महागली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. 13 ऑगस्ट रोजी 104 रुपयांनी सोने महागले. 14 ऑगस्ट रोजी त्यात 110 रुपयांची घसरण झाली.तर, आज पुन्हा घसरणीचे संकेत मिळाले आहेत.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे.
दरम्यान, तुम्ही सोने आणि चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा :
अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायचं करिअर उद्ध्वस्त केलं? व्हायरल पोस्टमुळे खळबळ
लाडक्या बहीणींनो, योजनेचा पहिला हप्ता आला; खात्यात 3000 आले की नाही असं चेक करा
महायुतीत नाराजीनाट्य, मंत्रिमंडळ बैठकीत CM शिंदे आणि अजित पवारांमध्ये धूसफूस?