भारतीय क्रिकेट संघाचा चित्ता ठरला हार्दिक पांड्या, व्हिडीओ पाहून तुम्ही पण व्हाल थक्क

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सध्या मालिका सुरु आहे, भारत बांग्लादेश यांच्यामध्ये दोन सामने(team) झाले आहेत. भारताच्या संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये पहिला सामना झाला, यामध्ये टीम इंडियाने १२८ धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताच्या संघाने ८६ धावांनी विजय मिळवून भारताने मालिका २-० ने जिंकली आहे. या मालिकेचा शेवटचा सामना अजूनही शिल्लक आहे.

भारतीय फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताच्या संघाने(team) कमालीची कामगिरी केली आहे. कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने २२२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने फलंदाजीने प्रभावित केले होते, त्याचबरोबर त्याच एक शॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आता पुन्हा हार्दिक पांड्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिक हा त्याच्या फिल्डिंगमुळे बऱ्याचदा चर्चेत आला आहे. आता पुन्हा हार्दिक पांड्याचा एक कॅच व्हायरल होत आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या स्वॅग शॉटने सर्वांना आपले चाहते बनवले होते, तर दुसऱ्या T२० सामन्यात हार्दिकने सनसनाटी बाउंड्रीवरचा झेल घेऊन चर्चेत आहे.

हार्दिकच्या या शानदार झेलचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्याच्या या कॅचचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या T२० सामन्याचा एक खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याने अप्रतिम झेल घेतला तेव्हा ते पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

बांग्लादेशच्या डावाच्या १४व्या षटकात रिशाद हुसेनने वरुण चक्रवर्तीविरुद्ध उंच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला चेंडूशी योग्य संपर्क साधता आला नाही. चेंडू दोन क्षेत्ररक्षकांमध्ये पडू लागला, पण हार्दिकने डीप मिडविकेटवरून धाव घेतली आणि सीमारेषेवर येताच त्याने उडी मारली आणि एका हाताने अप्रतिम झेल घेतला. हा झेल प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला आणि संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले.

हेही वाचा:

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक राज्य सरकारकडून रद्द

केदारनाथ धामचे दरवाजे लवकरच बंद होणार, दर्शन कधीपर्यंत घेता येईल?

नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर, अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला