भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या(divorce lawyers) निशाण्यावर आहे. मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद स्वीकारल्यापासून त्याच्यावर जोरदार टीका होताना दिसतंय. हेच नाही तर आता हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात देखील मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. हार्दिक पांड्या हा पत्नी नताशा हिच्यासोबत घटस्फोट होणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर यांच्यातील वाद टोकाला गेलाय. नताशा ही सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करताना देखील दिसत आहे. तिने एका पोस्टमध्ये लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार असल्याचेही म्हटले.
सतत घटस्फोटाची चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्या(divorce lawyers) हा मात्र बेपत्ता झालाय. भारतीय क्रिकेट संघ टी 20 विश्वचषक 2024 चा सामना खेळण्यासाठी यूएसएला रवाना झालाय. मात्र, यावेळी हार्दिक पांड्या दिसला नाहीये. बाकी जवळपास क्रिकेटर दिसत आहेत. याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोनंतरच हार्दिक पांड्या कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विमानतळावरून टी 20 विश्वचषकासाठी निघालेल्या खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रोहित शर्मा याच्यापासून ते ऋषभ पंतपर्यंत जवळपास सर्वच खेळाडू दिसत आहेत. फक्त हार्दिक पांड्या हा दिसत नाहीये. यामुळे आता हार्दिक पांड्या नेमका कुठे आहे, हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.
एका रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, हार्दिक पांड्या हा सध्या प्रशिक्षणासाठी लंडनला गेला आणि तो तिथूनच टी 20 सामन्यासाठी यूएसएला पोहोचेल. मात्र, याबद्दल अजून काही स्पष्टीकरण देण्यात नाही आले. घटस्फोटाची सतत चर्चा सुरू असतानाच असा अचानकपणे हार्दिक पांड्या गायब झाल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
हार्दिक पांड्या याने काही महिने नताशा हिला डेट करून लग्न केले. हेच नाही तर यांचा एक मुलगा देखील आहे. हार्दिक पांड्या याने अगोदरच खुलासा केला की, आपल्या नावावर फक्त 50 टक्केच संपत्ती आहे, बाकी त्याची 50 टक्के संपत्ती ही त्याच्या आईच्या नावावर आहे. फक्त हेच नाही तर इतर घर आणि गाड्या त्याच्या वडिलांच्या आणि भावाच्या नावावर आहेत.
हेही वाचा :
ट्रकचालकाने दुचाकीचालकाला चिरडलं; संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक
निवडणुकीनंतर ठाकरे भाजपसोबत? शरद पवारांनी दिले हे उत्तर
…तर माझ्यावरही गुन्हे दाखल करा; सांगलीत रोहीत पाटील यांनी पोलीस ठाण्यात मांडला ठिय्या