पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला, अशी थेट तुलना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर नगरीतील वस्त्रोद्योगनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीची थेट पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आजूबाजूला सर्व अदृश्य शक्तींनी धैर्यशील मानेंना घेतला असताना देखील त्यांनी दिवा लावला, असे वक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तीने घेरलं होतं. अदृश्य शक्तीने घेतल असताना देखील पाक व्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजी मधून धैर्यशील माने यांनी वादळात देखील दिवा लावला.
इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अज्ञात शक्तीने घेरले होते. तरीदेखील या वादळात देखील धैर्यशील माने यांनी दिवा लावून विजय मिळवला, असे वक्तव्य त्यांनी वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते. परंतु काही अज्ञात शक्ती देखील माझ्यासोबत होत्या. त्यांची नावे घेतली तर अवघड होईल. परंतु होता जीवा म्हणून वाचला शिवा असे सांगत धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचे सहकार्य झाल्याचे स्पष्टोक्ती दिली. परंतु भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मात्र इचलकरंजीला पाक व्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने त्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा :
संभाजी राजे छत्रपतींना अटक करा! मुस्लिम समाजाची मागणी
एका रसगुल्लाने घातला लग्नात गोंधळ, रंग बिघडला, मारामारी आणि दगडांचा पाऊस
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत जाणार?; अजित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया