हर्षवर्धन पाटील यांचं संधी साधू राजकारण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचा (politics)हात झटकून हाती कमळ घेणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी आता
तुतारी हातात घेतली आहे. ज्यांनी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने शरद पवार यांना शत्रूस्थानी मानले
त्यांनीच आता शरद पवार यांच्यावर स्तुती सुमनांची उधळण चालू केली आहे. एकूणच हर्षवर्धन पाटील यांचे गेल्या 35 वर्षातील राजकारण हे संधी साधू राहिले आहे.

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात(politics) मंत्री राहिलेले शंकरराव पाटील यांनी हयात भर शरद पवार यांना विरोध केला. त्यांनीच आपले पुतणे हर्षवर्धन पाटील यांना राजकारणात लॉन्च केले. शंकरराव पाटील यांच्या पश्चात त्यांनीही आपल्या राजकारणाचे सूत्र शरद पवार विरोधी ठेवले होते. इंदापूर तालुक्यातून ते अगदी सुरुवातीला अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून जात होते.

इसवी सन 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेव्हा 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा युतीला देऊन हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री पद पटकावले होते. तदनंतर युतीची सत्ता गेली आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आले तेव्हा हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस मधून विधानसभेवर निवडून आले होते. आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. ते बरीच वर्षे कोल्हापूरचे पालकमंत्री होते.

काँग्रेस आघाडीला आता फारसे भवितव्य नाही असा राजकीय विचार करून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी आता मला रात्री शांत झोप लागते. माझ्या पाठीमागे ईडीची पीडा नाही, इन्कम टॅक्स चा ससेमिरा नाही. त्यामुळे शांत झोप लागते या त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया वक्री झाल्या होत्या.
भारतीय जनता पक्षामध्ये आपणाला फारसे महत्त्व दिले जात नाही या विचाराने ते नैराश्यात गेले होते. त्यांची नाराजी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष पद बहाल केले होते.

मात्र त्यांना राज्यसभा किंवा विधानपरिषद हवी होती. अजित दादा पवार हे भाजपच्या प्रभावाखाली सत्तेत गेल्यानंतर बारामती इंदापूर येथील राजकारणाची समीकरणे बदलली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपणाला इंदापूर किंवा तत्सम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केल्यानंतर आता तुम्हाला शांत झोप लागणार का असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

हर्षवर्धन पाटील यांचे राजकारण(politics) हे शरद पवार यांना विरोध करणारे होते. संधी मिळेल तेव्हा ते शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत असत. शरद पवार विरोधक म्हणून त्यांना सर्वसामान्य जनतेने वेळोवेळी विधानसभेवर पाठवले होते. शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता ते म्हणतात की राजकारणात कायमचा कुणी शत्रू असू शकत नाही. आता तर त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे निवडून येण्यासाठी शांतपणे झोप घेऊन चालणार नाही तर जागृत राहून मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. त्यामुळेच निवडणुका जाहीर होईपर्यंत आणि निकाल लागेपर्यंत त्यांची झोप उडणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी त्यांचा अप्रत्यक्ष मला लाभ झाला. त्यांची मला मदत झाली असे सांगून चर्चेचा धुरळा उडून दिला आहे. याचा अर्थ हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केलेले नाही असा होतो. एकूणच जिथे संधी तिथे ते जात असतात. भाजपमध्ये संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तुतारी हातात घेतली आहे. आता त्यांच्या तुतारीचा आवाज शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचतो का हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

शरद पवार यांना कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचे आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जादा यश मिळाल्यानंतर त्यांच्यातील आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांना महायुतीचे सरकार हटवायचे आहे आणि महाराष्ट्रात आपल्या पसंतीचा मुख्यमंत्री करावयाचा आहे. त्यामुळेच त्यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. म्हणूनच सातत्याने त्यांचे टीकाकार राहिलेले हर्षवर्धन पाटील यांना त्यांनी आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा:

डिसेंबरपर्यंत ‘या’ 3 राशी जगणार राजासारखं जीवन

‘आज की रात’ गाण्यावर तरूणाचा जबरदस्त डान्स…Video Viral

काँग्रेसचेच सरकार येईल, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास