कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मंगळवारी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या उत्तर भारतातील दोन राज्यांच्या विधानसभा(Political) निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारली. हा निकाल भाजपला धक्कादायक वगैरे नव्हता. आणि राष्ट्रीय काँग्रेसलाही आनंद व्हावा असा नव्हता. मात्र हरियाणा राज्यात तिसऱ्यांदा सरकार भाजप स्थापन करणार आहे.
हरियाणात भाजप जिंकली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा टेन्शन वाढलं. हरियाणा मध्ये काँग्रेस एकाकी लढली. इंडिया आघाडीला सोबत घेऊन लढली असती तर हरियाणात भाजपची सत्ता आली नसती अशा प्रकारचं विश्लेषण महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील काहीजणानी केलेले आहे. विशेषतः काँग्रेस पेक्षा उभाठा सेनेतील संजय राऊत यांना काँग्रेसचा पराभव फारच जिव्हारी लागलेला आहे. काँग्रेसचा मोठ्ठा पराभव हरियाणात झाल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत(Political) सर्वाधिक म्हणजेच 14 जागा जिंकल्यानंतर काँग्रेस हा महाविकास आघाडीचा मोठा भाऊ बनला आहे. नाना पटोले वगैरे नेत्यांनी तसे अनेकदा बोलून दाखवले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा(Political) निवडणुकीत जागा वाटपात काँग्रेसने महाविकास आघाडीकडे जादा जागा मागितलेल्या आहेत. इतकेच नाही तर महाविकास आघाडी बहुमताला पोहोचली तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे हे नेते अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत आहेत. हरियाणात पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसला त्याचा जबर धक्का बसलेला आहे. पण चेहऱ्यावर तसे भाव न दाखवता महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार येईल असे काँग्रेस नेते बोलू लागले आहेत.
हरियाणा निकालाच्या पार्श्वभूमीवर उभाठा सेनेने तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असे जाहीरपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे असेच संजय राऊत यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा अर्थात काँग्रेस किंवा शरद पवार गटाचा असला तरी आम्ही समर्थन देऊ असे पुन्हा एकदा या दोघांनी सांगितल्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही ठीकठाक आहे असे म्हणता येणार नाही.
शरद पवार यांना त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री करावयाचा आहे. महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असे ते वारंवार सांगत असले तरी त्यांच्या मनाचा ठाव किंवा थांगपत्ता कुणालाही लागत नाही हे वास्तव आहे. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मात्र आम्हाला मुख्यमंत्री पदात सारस्य नाही असे सांगितले असले तरी राजकारणात कोणीही आणि केव्हाही यु टर्न घेत असतो.
काँग्रेसने मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या संदर्भात आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका त्यांनी गेल्या महिन्यात मांडली होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त धक्का बसल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राजकीय आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यातच इतर पक्षातील काही संधी साधून राजकारणी शरद पवार गटाकडे वळू लागले आहेत. त्यामुळेच यंदा महाराष्ट्रात परिवर्तन घडणार असा आत्मविश्वास शरद पवार हे सुद्धा बोलून दाखवत आहेत. त्यानंतर शरद पवार गटातून मुख्यमंत्री पदाची काही नावे सुचित केली जाऊ लागली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असा जाहीरपणे आग्रह सुरू केलेला दिसतो.
महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्री(Political) पदाचा चेहरा आहे असे अनेकदा शरद पवार यांनी स्पष्ट केले असूनही उद्धव ठाकरे यांचा त्यावर विश्वास नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी अगदीच घायकुतीला आलेले दिसतात. कोणत्याही घटक पक्षाकडे मुख्यमंत्री पद जाऊ दे आमचा त्याला पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरे सांगतात. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला तर महाविकास आघाडी एकसंध राहणार नाही अशी भीती शरद पवार यांना असावी. वास्तविक एकापेक्षा अधिक पक्षांचीची निवडणूक पूर्व आघाडी झाली तर ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे साधे आणि सरळ राजकीय समीकरण असताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीच्या आधी जाहीर करा अशी मागणी करण्यामागे काय हेतू आहे हे समजायला मार्ग नाही.
विधान परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर नीलम गोऱ्हे ह्या सनसनाटी वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. पण त्यांनी चार दिवसांपूर्वी राजकीय ब्रेकिंग न्यूज येईल असे भाष्य केले आहे. राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू असत नाही असे सांगून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची उत्सुकता वाढवलेली आहे. त्यांच्या या वक्तव्याशी, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीचा काही संबंध असेल काय?
हेही वाचा:
भन्नाट फीचर्ससह BYD eMax 7 कार लाँच; जाणून घ्या किंमत
स्त्री २ ची नशा आता ओटीटीवर! या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर झाली प्रदर्शित
कोल्हापूर: अजित पवार यांचे आवाहन – महायुतीचे सरकार आणा, लाडकी बहीण योजना सुरू ठेवा