अभिनेत्री(actress) रेखा आजही भल्या भल्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकतात. रेखा अजूनही चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. तसंच अनेक कार्यक्रमात त्या सहभागी होताना दिसून येतात. त्यांची रिअल लाईफही चित्रपटाच्या कथानका इतकीच रंजक राहिली आहे.
आज सुद्धा रेखा(actress) यांच्या सिनेमातील गाणे ट्रेंडींगला असतात. आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच रेखा आपल्या पर्सनल लाईफमुळे सुद्धा चर्चेत आहेत. दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलत असताना रेखा यांनी त्यांच्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आहे.
रेखा यांच्या जिवनावर आधारीत यासिर उस्मान यांनी रेखा: कैसी पहेली जिंदागानी या पुस्तकार त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. रेखा यांच्या आयुष्याबद्दल कोणालाच काही गोष्टी माहित नसलेले किस्से यासिर यांनी या पुस्तकात लिहिले आहेत. या शिवाय, एका मुलाखतीमध्ये रेखा यांनी त्यांच्या सेक्स लाईफ आणि प्रेग्नेंसीबद्दल वक्तव्य केलं आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना रेखा म्हणाल्या की, तुम्ही एका पुरुषाच्या अत्यंत जवळ येऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत. शिवाय रेखा यांनी लग्नाआधी शारीरिक संबंधांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं.
शारीरिक संबंधाविषयी बोलत असताना रेखा म्हणाल्या की, ‘लग्नाआधी सेक्स करणं अत्यंत सामान्य गोष्ट आहे. हायपोक्राइट लोकं म्हणतात की, लग्नानंतरच मुलींनी सेक्स कारायला हवं अशी लोकं काहीही वाचाळ बडबड करत असतात. जिथे एकमेकांवर प्रेम असतं, तिथे शारीरिक संबंध सामान्य गोष्ट आहे. मी अद्याप योगायोगाने प्रेग्नेंट राहिली नाही, असा खुलासा रेखा यांनी यावेळेस केला.
हेही वाचा :
श्रीकांत शिंदे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये; अशाप्रकारे तपासा यादी
‘आता मुंबईचा महापौरही आमचा असेल’; भाजपच्या तयारीने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं