तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही बऱ्याचदा काही विचित्र किंवा धक्कादायक घटनांचे व्हिडिओ पाहिले असतील. सोशल मीडियावर अशा गोष्टी फार कमी वेळेत व्हायरल(viral) होतात. लोकही फार मजा घेऊन हे व्हिडीओज पाहत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला धक्का देतात तर थक्क करून जातात. इथे काही अपघातांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात सध्या अशाच एका थरारक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यातील दृश्ये तुमचे मन विचलित करेल.
नुकताच सोशल मीडियावर व्हायरल(viral) झालेला व्हिडिओ तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. यात एका धक्कादायक घटनेचा थरार दिसून येत आहे. मुळातच एखादी गरम वस्तू जवळ असली की आपल्याला आधीच त्यापासून दूर राहण्याचा किंवा त्याजागेत सांभाळून वावरण्याचा सल्ला दिला जातो. सध्याच्या व्हायरल व्हिडिओत असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे, यात एक व्यक्ती चक्क उकळत्या पाण्याच्या टोपात पडल्याचे दिसत आहे. व्हिडिओतील दृश्ये आता अनेकांच्या अंगावर काटा आणत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक माणूस काही गरम पाण्याच्या टोपांच्या मधोमध जाऊन उभा असल्याचे दिसून येते. पुढे दिसते की, अचानक त्याचा तोल जातो आणि तो थेट उकळत्या पाण्याच्या टोपात जाऊन पडतो. आता तो ज्याप्रकारे यात पडतो ते पाहून यात स्वत:हून पडतो की मुद्दाम पडतो हे अजून स्पष्ट झालं नाही.
व्यक्ती पाण्यात पडताच आजूबाजूची लोक त्याच्या दिशेने धाव घेतात आणि त्याचा हाथ खेचून त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतात. अनेक प्रयत्न करून झाल्यानंतर शेवटी ते पाण्याचे भांडे खाली पाडत लोकं माणसाचा जीव वाचवतात. व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र व्हिडिओतील दृश्यांनी आता अनेकांच्या काळजात धस्स केलं आहे.
थरार घटनेचा हा व्हिडिओ @preet88476 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अरे देवा’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला असे वाटते की तो दारूच्या नशेत खाली पडला असावा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला थंडी वाजत असेल”.
हेही वाचा :
भरदिवसा खासदारावर झाडल्या गोळ्या; जागीच मृत्यू
बांग्ला हिंदूंवर कट्टरपंथीयांचे हल्ले भारतात उसळली संतापाची लाट!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ भूमिकेमुळे रखडला मंत्रिमंडळ विस्तार