कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : स्वबळाच्या आसपास जाऊन पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाच्या(political news) देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. पंधरावी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून ते गुरुवारी शानदार समारंभात शपथ घेतील.
गेल्या दहा वर्षात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 132 आमदार पहिल्यांदाच विजयी झालेले आहेत आणि त्याचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावे लागेल.
भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ(political news) नेता निवडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांना मुंबईत निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे सर्वच नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत अशी भावना निरीक्षकांच्या समोर व्यक्त केली. विधिमंडळ नेते पदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोबत घेऊन राज्यपाल श्री राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला आमंत्रित करावे अशा आशयाचे पत्र सादर केले.
पंधराव्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने विशेषतः भारतीय जनता पक्षाने नेत्रदीपक यश मिळवले. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे स्वच्छ आणि स्पष्ट होते. एकनाथ शिंदे यांना आणखी काही महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद हवे होते. त्यांच्या वतीने संजय शिरसाठ, उदय सामंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा अशी मागणी केली होती. अर्थात 132 आमदार संख्या असलेल्या भाजपकडून ही मागणी मान्य होईल असे तीळमात्र वाटत नव्हते.
वास्तविक शिवसेनेत मोठे बंड करून 40 पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केले. हा तसा अडीच वर्षांपूर्वी राबवलेला बिहार पॅटर्न होता. कारण भाजपकडे सर्वाधिक म्हणजे 105 आमदार असतानाही त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री केले. हा बिहार पॅटर्न दुसऱ्यांदा भाजपकडून राबवला जाईल असे वाटत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होते आणि ही नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण ते वेगळा निर्णय घेऊ शकत नव्हते. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून आपण बिलकुल नाराज नव्हतो हे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची(political news) सत्ता आली आणि सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी अन्य कुणाचे तरी नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे केले जाईल असे बोलले जात होते. तथापि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे 132 उमेदवारांनी विजय संपादित केल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडे फडणवीस यांची निवड करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांची विशेष मर्जी आहे. अजित दादा पवार यांना सोबत घेतल्यामुळे संघाकडून थोडीफार नाराजी व्यक्त केली गेली होती. पण आता तो इतिहास झाला आहे.
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अपक्षांसह 120 आमदारांचे पाठबळ होते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा शिवसेना त्यांच्यापासून काहीशी दूर गेली होती. विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्या इतके संख्याबळ फडणवीस यांच्याकडे नव्हते मात्र अचानक पणे शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फडणवीस सरकारला बाहेरून विनाशर्त पाठिंबा देऊन महाराष्ट्राला चकित करून सोडले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली.
इसवी सन 2019 मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळी अजितदादा पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पण त्यांचे हे मुख्यमंत्रीपद अवघ्या 80 तासात हातातून निसटून गेले होते. पहाटेचा शपथविधी म्हणून ते 80 तासांची कारकीर्द आजही लोकांच्या स्मरणातून गेलेली नाही.
आता 2024 मध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आणि त्यातही स्वबळाच्या आसपास जाईल इतके भाजपचे आमदार फडणवीस यांनी निवडून आणले. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा सुरू झाली आणि आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून समोर येत आहेत.
लाडकी बहीण योजना आणि एक है तो सेफ है या दोन बाबी महायुतीसाठी गेम चेंजर ठरल्या. भाजपने स्वतंत्रपणे आणि इतर घटक पक्षांनी स्वतंत्रपणे या निवडणुकीत जाहीरनामे प्रसिद्ध करून 25 आश्वासने मतदारांना दिली गेली आहेत. आता या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आणि प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी मंत्री गट स्थापन केला जाणार आहे. असे असले तरी लाडकी बहीण योजना अखंडितपणे पुढे नेत आहोत असे तातडीने नव्या सरकारने जाहीर केले पाहिजे. 25 पैकी किमान 15 आश्वासनांची पूर्तता येणाऱ्या पाच वर्षात केली तरी ते फडणवीस सरकारचे मोठे यश मानले जाईल.
हेही वाचा :
शपथविधीपूर्वीच सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव
“2100 रुपयांचा हप्ता मिळणार का? महायुती नेत्याचा 15 लाखांचा उल्लेख चर्चेत”
निम्म्या राज्यावर वादळी पावसाचं सावट; थंडीचं पुनरागमन कधी?