प्रेग्नेंसी आणि डिलिव्हरीनंतर महिलांच्या(delivery) शरीरात अनेक बदल होत असतात. टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील डिलिव्हरीनंतर शरीरात होणाऱ्या बदलांचा सामना करत आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्रद्धा आर्या आहे. श्रद्धा सध्या जुळ्या मुलांमध्ये व्यस्त असल्यामुळे छोट्या पडद्यापासूवन दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच अभिनेत्री तिच्या जुळ्या मुलांच्या नावाची देखील घोषणा केली. शिवाय डिलिव्हरीनंतर होत असलेल्या बदलांबद्दल देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. घिबली ट्रेंडमध्ये अभिनेत्रीने मुलांची नावं जाहीर केली.

सांगायचं झालं तर, डिलिव्हरीनंतर आईला असंख्य वेदना होत असतात. ज्यामुळे वजन कमी करणं, सतत मूड बदलणं, नैराश्य आणि इतर समस्या डोकं वर काढतात. दरम्यान, श्रद्धा हिने डिलिव्हरीनंतर होत असलेल्या समस्यांचा फोटो पोस्ट केला आहे. डिलिव्हरीनंतर अभिनेत्री केस (delivery) गळतीचा सामना करावा लागत आहे.श्रद्धाने एक फोटो पोस्ट करत केस गळत असल्याचं सांगितलं आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘हे खरं आहे…’ असं लिहित #hairfallafterdelivery या हॅशटॅगचा देखील वापर केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

श्रद्धा आर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीनेर राहुल नागल याच्यासोबत 2021 मध्ये लग्न केलं. लग्न होईपर्यंत अभिनेत्रीने रिलेशनशिप गुपित ठेवलं होतं. राहुल कायम लाईमलाईटपासून स्वतःला दूर ठेवतो. लग्नानंतर सप्टेंबर 2024 मध्ये श्रद्धा आणि राहुल यांनी प्रेग्नेसीची घोषणा (delivery) केली. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2024 मध्ये श्रद्धा जुळ्या मुलांना जन्म दिला.श्रद्धा – राहुल यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. 1 एप्रिल 2025 मध्ये श्रद्धाने तिच्या जुळ्या मुलांची नावं जाहीर केली. श्रद्धाने तिच्या मुलाचं नाव ‘शौर्य’ आणि मुलीचं नाव ‘सिया’ ठेवलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे.
हेही वाचा :
मुकेश अंबानी यांनी उडवली Google ची झोप!
धावत्या ट्रेनमधून तरुणाचा उडी मारण्याचा स्टंट अन्…; VIDEO पाहून अंगावर काटा येईल
‘माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले…’ चिमुकल्या बाळाने गिळल्या आजोबांच्या अस्ती Video Viral
बोलण्यात गोडवा वागण्यात हुशारी अनावश्यक खर्च टाळतात या मुलांकाच्या मुली
गौतमी पाटीलची पहिलीचं गवळणं प्रदर्शित, “कृष्ण मुरारी” गाणं सोशल मीडियावर व्हायरल!