पुणे : जेवणात खर्डा(chillies) न दिल्याने महिलेवर चाकूने वार केल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुप्रिया पंकज पाचारणे (वय ४०, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पंकज मच्छिंद्रनाथ पाचारणे (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुप्रिया यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी पंकज रिक्षाचालक आहे. रविवारी सायंकाळी तो घरी आला. त्याने पत्नी सुप्रिया यांना मिरचीचा खर्डा(chillies) करुन देण्यास सांगितले. तेव्हा तुम्ही मिरची घेऊन या. मी खर्डा करून देते, असे सुप्रियाने सांगितले. यावरुन पंकज चिडला आणि त्यांच्या कानाखाली मारली.
तेव्हा त्यांचा मुलगा आर्यनने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वयंपाक घरातून चाकू आणला. आर्यनला मारण्यासाठी चाकू उगारला. झटापटीत सुप्रिया यांच्या डाव्या डोळ्याजवळ चाकू लागल्याने त्या जखमी झाल्या. पोलीस हवालदार तेजपाल तपास करत आहेत.
हेही वाचा:
शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांना आणखी एक धक्का
तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान आणि रजनीकांतची जोडी झळकणार
इचलकरंजीतील वयोश्री योजनेचे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा: दिवाळीपूर्वी आनंदोत्सव