नाशिक: काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शरद पवार(political news today) यांच्या राष्ट्रवादीकडून शेकापचे नेते जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण या निवडणुकीत जंयत पाटील यांचा पराभव झाला. मतदानावेळी काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केल्याने जयंत पाटील पराभूत झाले, असा संशयही व्यक्त करण्याता आला होता. यात काँग्रेसचे हिरामण खोसकर यांच्यावरही संशय व्यक्त करण्यात आला. याच हिरामण खोसकर यांनी आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार(political news today) यांनी हिरामन खोसकर काँग्रेसमध्ये असले तरी ते आमचेच आहेत. ते आमच्या बैठकांनाही उपस्थित असतात, असे म्हटले होते. आता हिरामण खोसकर यांनी हा शब्द खरा ठरवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांवर क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. यात हिरामण खोसकर यांच्याही समावेश होता. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनाही पक्षविरोधी कारवाई प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावरही क्रॉस व्होटींगचा आरोप आहे.
त्यानंतर सुलभा खोडकेंप्रमाणे आपल्यालरही कारवाई होण्याची शक्यता असल्याने हिरामण खोसकर सावध झाले होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी आपल्या काही विश्वासू आणि कंत्राटदारांशी चर्चा केली. काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने आपली राजकीय कारकीर्द सुरू राहण्यासाठी अजित पवार गटात प्रवेश करावा, असा सल्ला देण्यात आला. त्यानंतर हिरामण खोसकर काँग्रेसमधील नाराज असलेल्या संपत सकाळे, ठाकरे गटात प्रवेश केलेले संदीप गुळवे यांच्यासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. खोसकर यांच्यासह 15 इच्छुकांनी इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती.
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यापैकी कोणाला मिळणार याबाबत अद्याप काहीही जाहीर झालेले नाही. पण याठिकाणी माजी आमदार निर्णाला गावित गाविक यादेखील उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. त्यांनी ठाकरे गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. आज राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून आमदार हिरामण खोसकरांवर कारवाईची लटकती तलवार होती. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यांनी महायुतीतील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेत स्वत:साठी चाचपणीही केली होती.
पण आपल्यावर कारवाई होऊ नये, आपण एकनिष्ठ आहोत, असेही सिद्ध करण्याचा वारंवार प्रयत्नही केला. पण खोसकरांना उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाने आधीच घेतला होता. त्यानंतर उमेदवारी मिळण्याची कोणतीही चिन्हे न दिसल्याने त्यांनी काल रात्री अचानक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून आपल्यावर कारवाई करू नये. आपण एकनिष्ठ आहोत. असे वारंवार सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेसने खोसकर यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय आधीच घेतला होता.या पार्श्वभूमीवर खोसकर यांनी सोमवारी रात्री अजित पवार गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा:
एआय वापरताना जीमेल लॉगिन केलंय? तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा स्कॅम;
विधानसभेचे तीन मतदारसंघ नेत्यांची प्रतिष्ठा “पणा” ला लागणार!
भाजपसह मनसेला मोठं खिंडार, माजी आमदारासह बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश