जो दुसऱ्यांसाठी मेला , तो कायमचा जगला….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सत्ता आज आहे आणि उद्या नाही, मंत्रीपद असलं काय आणि नसलं काय, त्यामुळे काहीही फरक पडत नाही. जो दुसऱ्यासाठी मेला तो कायमचा जगला. आत्ता मी उरलो ओबीसींच्या लढ्याकरता. तत्त्वासाठी लढतोय आणि तत्त्वासाठी जगतोय. सत्तेचा मोह मला नाही. ही छगन भुजबळ(political) यांची काही भाषणातील वाक्ये. गेल्या दीड दोन महिन्यांपासून त्यांच्याकडून ही वाक्ये अधून मधून ऐकायला मिळतात.

वास्तविक अनेक वर्षे सत्ताकारणात असलेल्या, मंत्रीपद भूषविलेल्या आमदार छगन भुजबळ यांनी आता सत्तेच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली पाहिजे. पण त्यांना या वयातही सर्वसामान्य जनतेची सेवा करावयाची आहे आणि सेवा करण्यासाठी त्यांना सत्तेत जायचे आहे हे लपून राहिलेले नाही. म्हणजे त्यांच्या ओठात एक आणि पोटात दुसरंच आहे असे म्हणता येईल.

छगन भुजबळ(political) यांची पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यात त्यांनी बरेच काही खुलासे केले आहेत. हे त्यांचे खुलासे राजकीय सोयीचे आहेत. तेलगी मुद्रांक घोटाळ्यात आपले नाव आल्यानंतर तेव्हा शरद पवार यांनी माझा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पदाचा घाईघाईने राजीनामा घेतला. कारण नंतरच्या चौकशीत माझ्याविरुद्ध असे काहीच सिद्ध झाले नाही. असे ते म्हणतात.

पण नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक झाली होती तेव्हा याचा शरद पवार यांनी मी आणि माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छगन भुजबळ यांच्या पाठीशी ठामपणे आहे असे सांगितले होते, त्याचा ते साधा उल्लेखही करत नाहीत. तोंडातून सुटून आल्यानंतर, भ्रष्टाचाराच्या खटल्यातून कनिष्ठ न्यायालयात देशमुख झाल्यानंतर याच शरद पवारांनी त्यांना महाविकास आघाडीत मंत्री केले होते हे ते सोयीस्कररित्या विसरतात.

मंडल आयोगाच्या शिफारशींना बाळासाहेब ठाकरे(political) यांचा तीव्र विरोध होता म्हणून आपण शिवसेना सोडली असे सांगणाऱ्या छगन भुजबळ यांनी मग शिवसेनेत मोठे बंड करून 19 आमदार का फोडले? ते एकटे का बाहेर पडले नाहीत? शिवसेनेमध्ये मनोहर जोशी आणि सुधीर जोशी असल्याने भविष्यात मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आपला विचार होणार नाही हे गृहीत धरून त्यांनी तेव्हा शिवसेनेचे फोटो पाडली होती हे तेव्हाचे वास्तव आहे आणि होते.

त्यामुळे मी शिवसेना सोडली नसती तर मीच मुख्यमंत्री झालो असतो किंवा काँग्रेस सोडली नसती, शरद पवार यांच्याबरोबर गेलो नसतो तर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो, तसा काँग्रेसने मला शब्द दिला होता. असे ते सांगतात. मुख्यमंत्री पदाची दोनदा आलेली संधी मी साधली नाही, कारण मला ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांचा लढा उभारण्यासाठी वेळ हवा होता.

दोनदा मुख्यमंत्री पद मिळण्याची चालून आलेली संधी नाकारणाऱ्या छगन भुजबळांनी आता सत्ताकारणातून आणि राजकारणातून(political) निवृत्ती जाहीर करून ओबीसींच्या हिताचे समाजकारण करणार असल्याची घोषणा केली पाहिजे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि सत्तेच्या महत्त्वकांक्षेसाठी त्यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे छगन भुजबळांचा लखोबा असा उल्लेख करत असत. तर आज बाळासाहेब ठाकरे यांना देवासमान मानणारे छगन भुजबळ हे तेव्हा त्यांचा” टी.बाळू”असा अपमानास्पद उल्लेख करत असत.

स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करून छगन भुजबळ यांनी अनेक वेळा आपली वैचारिक बैठक बदलली, भूमिका बदलली. राजभवनात काय चाललंय हे पाहून येतो असं शरद पवार यांना सांगून तिकडे गेलेल्या छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता तर ते शरद पवार यांचा “तळ्यात आणि मळ्यात करणारा राजकारणी”असा उल्लेख करतात.

हेही वाचा :

काय आहे आजचे सोन्या-चांदीचे भाव! वाचून तुम्हीही व्हाल आनंदीत

ट्रम्प यांचा भारताला धक्का! पहिलं विमान भारताकडे रवाना; अवैध प्रवाशांची रवानगी

‘महिलांना ब्रा साईजनुसार मिळणार…’; पबच्या ‘या’ ऑफरने उडाली खळबळ