आजच्या दैनंदिन जीवनात मायक्रोवेव्ह(microwave) हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. गॅसच्या तुलनेत तो चुटकीत जेवन गरम करतो, पण हाच मायक्रोवेव्ह तुमच्या आरोग्यासाठी कधी कधी धोकादायक ठरू शकतो, हे माहित आहे का?होय, मायक्रोवेव्हमध्ये काही अन्नपदार्थ पुन्हा गरम करणं तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं. काही पदार्थांच्या रचनेत गरम करताना बदल होतात, जे शरीरासाठी अपायकारक ठरतात. चला जाणून घेऊया अशा ३ गोष्टी, ज्या मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करणं टाळावं!

मांस व चिकन
अनेक वेळा उरलेलं चिकन, मटण किंवा तत्सम पदार्थ पटकन मायक्रोवेव्हमध्ये गरम केले जातात. पण मायक्रोवेव्हमध्ये अन्न समान तापमानाने गरम होत नाही. मांसाच्या बाहेरील भाग गरम होतो, पण आतील भाग नीट गरम होत नाही. अशा वेळी त्यात असलेले जीवाणू जसे की Salmonella नष्ट होत(microwave) नाहीत आणि फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. याशिवाय मांसाचे प्रोटीन गरम करताना बदलते, जे पचनासाठी त्रासदायक ठरू शकते.
अंडी
शिजवलेली अंडी मायक्रोवेव्हमध्ये गरम करणं म्हणजे धोक्याचा सिग्नल! अंड्याच्या आत वाफ साचते आणि दाबामुळे अंडं फाटून उडू शकतं. यामुळे तुमच्या चेहऱ्याला किंवा हाताला इजा होण्याचा धोका असतो. तसेच, ऑम्लेट, भुर्जी किंवा इतर अंडीचे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यावर चिवट आणि रबरासारखे होतात, ज्यामुळे ते खाण्याची मजा बिघडते.
सल्ला : अंडी ताजीच शिजवून खाणं उत्तम! गरम करायचं असल्यास, तवा किंवा पॅनवर हळुवार तापवावं.

हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये नैसर्गिक (microwave)नायट्रेट्स असतात. मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करताना या नायट्रेट्सचं रूपांतर Nitrosamines नावाच्या घातक घटकात होऊ शकतं, जे दीर्घकाळ शरीरात राहिल्यास कर्करोगाचा धोका निर्माण करू शकतात.
सल्ला : पालेभाज्या ताज्या असतानाच खाणं उत्तम! उरलेल्याच खायच्या असतील, तर थंडच खाव्यात किंवा गरम करण्याऐवजी तापमानावर आणूनच सेवन कराव्यात.
मायक्रोवेव्ह वापरणं खरोखरच सोयीचं आहे, पण काही गोष्टी त्यात गरम करताना सावध राहणं हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.
हेही वाचा :
DC vs MI सामन्यात तुफान हाणामारी! महिलेने केली तरुणाची धुलाई, Viral Video
लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार
ठाकरेंना आणखी एक धक्का! कोल्हापुरातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपात प्रवेश;
सैफ अली खान आणि करीना कपूर लग्नाच्या 13 वर्षांनी घेणार घटस्फोट?