कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हिंदू मतदारांच प्राबल्य असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ(latest political news) हे सातत्याने निवडून येतात. अल्पसंख्यांक समाजातील म्हणून त्यांच्याकडे तेथील मतदार पाहत नाहीत. असे असताना त्यांच्यावर शरद पवार यांनी कागलच्या गैबी चौकातील जाहीर सभेत बोलताना टीका केल्यावर त्यांनी अल्पसंख्यांक समाजाचे कार्ड बाहेर काढले आहे. मुळातच त्यांना अल्पसंख्य समाजाचा चेहरा म्हणूनच राजकारणात आणि सत्ताकारणात शरद पवार यांनी सातत्याने संधी दिली आहे. तसे नसते तर चंदगडच्या नरसिंग गुरुनाथ पाटील यांनाच शरद पवार यांनी मंत्री केले असते.
शरद पवार यांनी काँग्रेसचा(latest political news) हात हात सोडून इसवी सन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा त्यांच्याबरोबर सदाशिव मंडलिक हे ज्येष्ठ नेते सुद्धा होते. मंडलिक यांच्या शब्दाला राष्ट्रवादीमध्ये वजन होते. म्हणूनच त्यांनी त्यांचे व्याही चंदगडचे नरसिंग गुरुनाथ पाटील यांना मंत्रिमंडळाचा स्थान देण्यात यावे यासाठी शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. पण शरद पवार यांना पश्चिम महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांना सत्ता वर्तुळात आणावयाचे होते. म्हणून त्यांनी मुश्रीफ यांना मंत्री केले. त्यामुळे मी अल्पसंख्य समाजाचा आहे म्हणून शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने माझ्या पाठीमागे लागू नये अशी टीका मुश्रीफ यांनी करावी याला काही अर्थ नाही.
आपण अल्पसंख्या समाजाचे आहोत याची त्यांना आत्ताच का आठवण व्हावी? हिंदूंची बहुसंख्या असलेल्या मतदारसंघात आपणाला सातत्याने आमदार म्हणून समर्थन मिळते याचे विस्मरण त्यांना का व्हावे? ते स्वतः या मतदारसंघात”मुस्लिम”
असल्याच्या मानसिकतेत कधीही वावरलेले नाहीत. आत्ताच त्यांनी आपण अल्पसंख्य समाजाचे आहोत असे वारंवार सांगितल्यामुळे सामान्य माणूस चकित झाला आहे.
महायुती सरकारमध्ये अजितदादा यांच्यासह नऊ जण शरद पवार यांची साथ सोडून गेलेले मंत्री आहेत. त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करणे हे पवारांचे राजकीय उद्दिष्ट आहे. त्यातही नाशिक मधील येवला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हे दोन विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांनी अतिशय प्रतिष्ठेचे केले आहेत. भुजबळ आणि मुश्रीफ हे पराभूत झाल्याचे त्यांना पहायचे आहे. मुश्रीफ यांच्या विरुद्ध समरजीत सिंह घाटगे हा तगडा उमेदवार त्यांना मिळाला आहे. मंगळवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात समारंभ पूर्वक प्रवेश झाला.
त्यानिमित्ताने कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात जाहीर सभा झाली. या सभेत मुस्लिम यांचे प्रत्यक्ष नाव न घेता शरदपवार यांनी त्यांच्यावर तोफ डागली. त्यानंतर मीडियाशी बोलताना मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. अल्पसंख्यांक समाजाचे कार्ड त्यांनी बाहेर काढले. माझ्यासारख्या अल्पसंख्या समाजातील व्यक्तीच्या पाठीमागे ते का लागले आहेत असा सवाल त्यांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला आहे.
कागल मधील विधानसभा निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक अशी आहे असे मुश्रीफ म्हणतात. प्रतिस्पर्धी उमेदवार समरजीत सिंह घाटगे यांना ते खलनायक समजतात की शरद पवार यांना? कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही समरजीत सिंह घाटगे विरुद्ध मुश्रीफ यांच्यात रंगणार असली तरी खरी लढत शरद पवार विरुद्ध मुश्रीफ अशीच होणार आहे.
कागलच्या राजकारणात(latest political news) सदाशिवराव मंडलिक विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यातील वाद प्रचंड गाजला. हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. या गुरु शिष्यामधील वाद संपुष्टात आणण्यासाठी शरद पवार यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत मात्र त्यांनी मुश्रीफ यांनाच झुकते माप दिले. मुश्रीफ हे आजही गैबी चौकातील एका अरुंद गल्लीत असलेल्या घरात राहतात याबद्दल शरद पवार यांनी अगदी काल परवा कौतुक केले होते. पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा म्हणूनच ते मुश्रीफ यांच्याकडे पाहत होते.
सदाशिवराव मंडलिक यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याची नाराजी पत्करून पवार यांनी मुश्रीफ यांना राज्याच्या सत्ता वर्तुळात आणले होते. नंतर त्यांनीच आपली साथ सोडावी हे त्यांना जिव्हारी लागले होते. आणि म्हणूनच मुश्रीफ यांचा पराभव त्यांना करावयाचा आहे. त्यासाठी त्यांनी इथे आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
भारतीय जनता पक्षाचे कमळ बाजूला करून हातात तुतारी घेतलेल्या समरजीत सिंह घाटगे यांनी, हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याविषयी नाराजी नव्हे तर निषेध व्यक्त केला आहे. आपण अल्पसंख्यांक समाजाचे आहोत असे तब्बल सहा वेळा सांगण्याची मुश्रीफ यांना गरज का वाटली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुश्रीफ यांचा अल्पसंख्य असल्याचा मुद्दा घाटगे यांनी लावून धरला आहे. कारण त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत हाच मुद्दा प्रचारासाठी उपयोगी पडणार आहे.
हेही वाचा:
गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त…
आता कोल्हापुरातून गोवा जाता येणार तासाभरात; 19 सप्टेंबरला होणार पहिले उड्डाण
गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त…