ब्रेस्ट कॅन्सरसोबत लढा देणाऱ्या हिना खानचा नववधूच्या वेशात रॅम्पवॉक

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून घराघरांत प्रसिद्धीझोतात आलेली अक्षरा अर्थात हिना खान(actress)… या मालिकेनेच हिनाला विशेष प्रसिद्धी मिळाली. गेल्या काही दिवसांपूर्वीच हिनाने सोशल मीडियावरून ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. अभिनेत्रीला तिसऱ्या स्टेजचा हा आजार झाला आहे.

दरम्यान, हिना(actress) ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असून आजाराबद्दल ती वेळोवेळी सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते. हिना त्या आजारावर व्यवस्थित उपचार घेत असून ती स्वत:ला कायमच आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करते. अभिनेत्री परिस्थितीसमोर धैर्याने लढताना दिसत आहे.

काही तासांपूर्वीच हिनाने इन्स्टाग्रामवर नववधूच्या लूकमध्ये रॅम्पवॉक करताना दिसली. रॅम्पवॉक करतानाचा अभिनेत्रीने व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला असून सध्या चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत शिवाय तिच्या धाडसाचही कौतुक केले जात आहे.

हिना इतक्या गंभीर आजाराचा सामना करत असताना स्वत:ला इतकं आनंदीत कसं काय ठेवते ? असा प्रश्न तिला अनेक युजर्स विचारत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री नववधूच्या अंदाजात आनंदाने, आत्मविश्वासाने आणि उत्साहाने चालताना दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करताना खास सकारात्मक कॅप्शन देखील लिहिलं आहे.

व्हिडिओ शेअर करताना हिनाने कॅप्शन दिलंय की, “मला माझे वडील नेहमी म्हणायचे की, तू माझी एक स्ट्रॉंग मुलगी आहेस. केव्हाच रडायचं नाहीस. येणाऱ्या समस्यांबद्दल आणि अडचणींबद्दल केव्हाच तक्रार करू नकोस. स्वत:च्या जीवनावर तू नियंत्रण ठेव, खंबीर उभी राहा आणि त्याला सामोरे जा… म्हणून मी केव्हाच येणाऱ्या अडचणींचा जास्त विचार करत नाही.

जितकं आपल्या प्रयत्नात आहे, त्या गोष्टीवर माझं लक्ष आहे. बाकी सर्व देवावर सोडलंय. तो कायमच आपली प्रार्थनाही ऐकतो आणि प्रयत्नही पाहतोच. तो आपल्या प्रार्थना कायमच पाहतोय. हिना नेहमी पुढे चालत राहा, केव्हाच थांबू नको, हे सतत मी स्वत:ला सांगत आले आहे.” अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये शेवटी “नववधूच्या लूकमध्ये मी कशी दिसतेय ?” असा प्रश्नही तिने चाहत्यांना आणि सेलिब्रिटींना विचारला आहे.

लाल रंगाचा लेहंगा, ओढणी आणि डोक्यावर पदर ह्या गुजराती लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते. अभिनेत्रीच्या ह्या नववधूच्या लूकवर रुबिना दिलैक, सुरभी ज्योती, शोभा देवी, मोना सिंग, लता सबेरवाल सह अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी हिनावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ५ लाखांहून अधिक युजर्सने हिनाच्या ह्या व्हिडिओवर लाईक्स केले असून कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.

हेही वाचा:

छगन भुजबळ सांगत आहेत अंतरवालीचे पवार कनेक्शन

इचलकरंजी गणेश विसर्जनानिमित्त एसटी वाहतूक मार्गात बदल

शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका