कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचं सुरक्षित सत्ताकारण(workers) हे कार्यकर्त्याला राजकीयदृष्ट्या कसं असुरक्षित बनवत याचे उत्तम उदाहरण म्हणून समरजितसिंह घाटगे यांच देता येईल. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात वावरलेल्या समरजीत सिंह घाटगे यांनी हातातील कमळ बाजूला करून, शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली आहे. पारंपारिक राजकीय शत्रू असलेल्या हसन मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत पुढची चाल देण्याची चूक केली तर तालुक्यातलं आपलं राजकारण धोक्यात येऊ शकतं, अडचणीत येऊ शकत म्हणून समरजीत सिंह घाटगे यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या गटासाठी योग्य आहे.
कागल तालुका विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रस्थापित राजकारणी(workers) हसन मुश्रीफ यांना टक्कर देऊ शकेल अशा उमेदवाराच्या शोधात भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व होते. 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेल्या समरजीत सिंह घाटगे यांना भारतीय जनता पक्षाच्या मांडवात आणले. त्यांना एक महामंडळ दिले. जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती केली. वरिष्ठ वर्तुळात त्यांना स्थान दिले. समरजीत सिंह यांनीही गेल्या पाच वर्षात हा मतदारसंघ बांधला. मुश्रीफ यांच्याविरुद्ध एक तगडा उमेदवार भारतीय जनता पक्षाने तयार केला. पण मध्येच भारतीय जनता पक्षाचे सत्ताकारण आडवे आले.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची आपली सत्ता आणखी मजबूत करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली.
अजित दादा पवार हे 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली गेले. आता हे भारतीय जनता पक्षाचं सुरक्षित सत्ताकारण, विधानसभेच्या 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुतांशी स्वपक्षीय उमेदवारांना असुरक्षित करणार ठरल आहे. त्यामध्ये कागल विधानसभा मतदारसंघ येतो. रविवार दिनांक 2 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पक्षाने अजितदादा पवार यांना शरद पवार यांच्यापासून तोडण्याची जी खेळी केली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा रुचलेली नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात, अजितदादा पवार गटाच्या विद्यमान चाळीस आमदारांसाठी भारतीय जनता पक्षाला तेवढ्या जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधी लढलेल्या भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे. आता त्या सर्वांचे समाधान कसे करायचे हा मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसमोर आहे.
कागलचे समरजीत सिंह घाटगे यांना थांबवण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने खासदार धनंजय महाडिक वगैरे केला, विधान परिषदेचा पर्याय सुद्धा त्यांच्यासमोर ठेवला पण त्यांनी तो मान्य केला नाही. मला कागल मध्ये परिवर्तन घडवायचे आहे आणि त्यासाठी आणखी पाच वर्षे मला द्यावयाची नाहीत. असे समरजीत सिंह घाटगे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
समरजितसिंह घाटगे यांच्या माध्यमातून शरद पवार(workers) यांना एक तरुण आणि तगडा उमेदवार मिळाला आहे. त्यांना या मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांचा राजकीय हिशोब चुकता करावयाचा आहे. आत्तापर्यंत केलेली चूक त्यांना आता दुरुस्त करावयाची आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक समरजीत सिंह घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी होणार असली तरी ती अप्रत्यक्षरीत्या शरद पवार विरुद्ध हसन मुश्रीफ अशीच होणार आहे.
दिनांक 3 सप्टेंबर रोजी कागलच्या देवी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत समाजाचे सिंह घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. कागल विधानसभा मतदारसंघासाठी कैदी हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. प्रचाराच्या मोठ्या सभा याच गैबी चौकात होतात.
यापूर्वी शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्या प्रचारासाठी या चौकात सभा घेतल्या होत्या आता त्यांच्या विरोधात त्यांना सभा घ्याव्या लागणार आहेत आणि त्याची पहिली झलक दिनांक 3 सप्टेंबर रोजी च्या जाहीर कार्यक्रमात बघायला मिळणार आहे. आज पर्यंत मी या मतदारसंघातून चुकीचा उमेदवार देत आलो, त्याचे प्रायश्चित्त घेण्याचा एक भाग म्हणून मी तुमची माफी मागतो. अशी त्यांच्या भाषणाची सुरुवात असेल, जी त्यांनी छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात बोलताना केली होती.
हेही वाचा:
कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ‘करा उपवास’ संदेश; भक्तांची खास तयारी
राज्यात पावसाचा कहर: नाशिक,कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये संततधार पाऊस