नववर्षात अनेक उत्तम कार्स लाँच(launched) होण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी 2025 या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक दर्जेदार आणि आकर्षक कार्स लाँच होणार आहे. यामुळे अनेक कार्सप्रेमींचे लक्ष या ऑटो एक्स्पोकडे लागले आहे. याव्यतिरिक्त काही कार्स या ऑटो एक्स्पोच्या आधीच लाँच होणार आहे. त्यातीलच एक म्हणजे होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन.
होंडा कंपनी देशात अनेक उत्तम कार्स लाँच(launched) करताना दिसत आहे. ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार, कंपनी उत्तमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणत असते. आता Honda Elevate चे ब्लॅक एडिशन येत्या 7 जानेवारीला लाँच होणार आहे. अलीकडेच, ही SUV प्रॉडक्शन रेडी फॉर्ममध्ये टेस्टिंग दरम्यान दिसली होती.
Honda Elevate Black Edition दोन व्हेरियंटमध्ये ऑफर केली जाऊ शकते, जे Elevate Black Edition आणि Elevate Signature Black Edition असू शकतात. Honda Elevate Black Edition मध्ये नवीन काय उपलब्ध असणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
काय असेल नवीन?
ऑटोकारच्या अहवालानुसार, Honda Elevate Black Edition ला ग्लॉस ब्लॅक पेंट केलेल्या अलॉय व्हीलसह क्रिस्टल ब्लॅक पर्ल एक्सटीरियर पेंट, लेदरेट सीटसह ऑल-ब्लॅक इंटीरियर, वरच्या ग्रिलवर क्रोम फिनिश आणि रूफ रेल्सवर रेलवर सिल्व्हर फिनिश मिळेल. कारच्या दरवाजांच्या खालच्या भागावर सिल्व्हर फिनिश देखील दिसेल.
एक्सटिरिअर आणि इंटिरिअर
एलिव्हेट सिग्नेचर ब्लॅक एडिशनला एक्सटिरिअर, इंटिरिअर आणि अलॉय व्हीलसाठी समान सेटअप मिळेल. याशिवाय, काळ्या रंगाची अपर ग्रिल, रूफ रेल्सवर ब्लॅक फिनिश, फ्रंट आणि रिअर फॉक्स स्किड प्लेट्सवर ब्लॅक फिनिश, दरवाजांच्या खालच्या भागावर ब्लॅक फिनिश, फ्रंट फेंडरवर अतिरिक्त लोगो देखील दिसेल. याशिवाय ब्लॅक एडिशनमध्ये 7 कलर इंटीरियर ॲम्बियंट लाइटिंग देखील उपलब्ध असेल.
सिंगल पॅन सनरूफ आणि ADAS मिळेल
Honda Elevate च्या ब्लॅक आणि एलिव्हेट सिग्नेचर ब्लॅक एडिशन्स टॉप व्हेरियंटवर आधारित असणार आहेत, याचा अर्थ असा आहे की ते फीचर्सच्या बाबतीत ही कार पूर्णपणे सुसज्ज असणार आहे. सिंगल पेन सनरूफ आणि ADAS देखील ब्लॅक एडिशनमध्ये दिसतील.
कसे असेल इंजिन?
Honda Elevate Black Edition मध्ये कोणतेही मेकॅनिकल बदल दिसणार नाहीत. पूर्वीप्रमाणे, यात समान 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल, जे मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल. त्याच वेळी, हे इंजिन पूर्वीप्रमाणेच पॉवर आणि टॉर्क जनरेट करेल.
किंमत किती असेल?
Honda Elevate ची एक्स-शोरूम किंमत 11.69 लाख ते 15.41 लाख रुपये आहे. हे लक्षात घेता, ब्लॅक एडिशनची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा 75,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकते.
हेही वाचा :
“छगन भुजबळांनी पक्ष काढावा, आम्ही युती करु”..; ‘या’ नेत्याने थेट दिली ऑफर
कोल्हापूरात साखर कारखान्यांचा ‘एफआरपी’प्रमाणे दर जाहीर
महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट: समृद्धी महामार्ग फेब्रुवारीत प्रवाशांच्या सेवेत