कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा महामार्गावर भीषण अपघात(accident) झालाय. गोलापुरा येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो दरीत कोसळला. त्यामुळे ट्रक चक्काचूर झालाय. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. आज 22 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झालाय.
कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात आज पहाटे एक मोठा रस्ता अपघात(accident) झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. सावनूरहून कुमठा बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी जात असलेल्या ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव वेगात ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक उलटला, त्यामुळे हा भीषण अपघात झाला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नारायण एम यांनी दिली आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज पहाटे भाजीपाला ट्रकमध्ये हे लोक प्रवास करत होते. ते 50 मीटर खोल दरीत पडले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मृत्यू झालेले सर्व फळ विक्रेते सावनूर येथून फळे विकण्यासाठी यल्लापुराकडे निघाले होते. उत्तरा कन्नडचे पोलीस अधीक्षक एम नारायण यांनी सांगितले की, ते सावनूर-हुबळी रस्त्यावर प्रवास करत असताना जंगलाच्या परिसरात हा अपघात झाला.
नारायण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, ‘पहाटे चारच्या सुमारास ट्रक चालक दुसऱ्या वाहनाला रस्ता देण्याचा प्रयत्न करत असताना डावीकडे गेला. तो सुमारे 50 मीटर खोल दरीत पडला.’ घाटीत रस्त्यावर सुरक्षा भिंत नाही. 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले. जखमींना हुबळी येथील KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
यल्लापुरा येथे ट्रक 50 मीटर खोल दरीत कोसळली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. प्राथमिक तपासात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.
हेही वाचा :
राज्यात राजकीय भुकंप होणार; शरद पवार, उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार?
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक पौष्टिक शेवयांचा उपमा
व्हीव्हीआयपींच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारचा नवा आदेश, खर्चावर बसणार आळा