भयानक रस्ता अपघात; दोन बसच्या धडकेत 37 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

बोलिव्हियात एक भीषण दुर्घटना घडली आहे. बोलिव्हियाच्या दक्षिण भागात दोन बसची जोरदार धडक झाली असून या अपघातात(accident)37 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करम्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दोन प्रवासी बस एकेकांना जोरदर धडकल्या आणि हा अपघात घडला.

मिळालेलल्या माहितीनुसार, उयुनी आणि कोलाचानी दरम्यानच्या महामार्गावर ही दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास एक बस चुकीच्या लेनमध्ये गेल्याने अपघात घडला. ही घटना अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमध्ये सर्वात प्राणघात घटनांपैकी एक ठरली. अपघातात(accident) 39 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उयुनी शहरातील चार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक तपासानुसार, अपघाताचे कारण एका बसचा जास्त वेग आणि चुकीच्या लेनमध्ये गेल्याने हा अपात घडला.

पोटोसी विभागीय पोलिस कमांडने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 37 जणांचा मृत्यू झाला आहे. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिस कमांडने सांगितले की, एक बस ओरुरो शहराकडे वीकेंड ओरुरो कार्निव्हलला जात होती. हा ओरुरो उत्सव लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे आणि यासाठी हजारो लोक सहभागी होतात.

घटनेची माहिती मिळताच बचावपथक आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. दुर्घटनास्थळी क्रेनच्या मदतीने रस्त्यावर उलटलेली बस सरळ करण्यात आली. बसच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच जखमींना देखील वाचवण्यात आले असून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या मृतांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. तसेच जखमींना वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.

बोलिव्हियाच्या सरकारच्या मंत्रालयाने निवेदन जारी केले असून, या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. सध्या अपघातांच्या कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरु आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जास्त वेग आणि चुकीच्या बाजून बस जाणे ही अपघातांची संभाव्य कारणे असून शकतात. या प्रकरणात कोणाचीही जबाबदारी असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Jio चा ‘हा’ प्लॅन Airtel पेक्षा 50 रुपयांनी स्वस्त

रोहित शर्माला झालंय काय?, चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारताचं टेन्शन वाढलं

शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन करा; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला