श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ चित्रपटाने २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आपलं स्थान प्रस्थापित केले आहे(life partner). सिनेमाच्या सक्सेसमध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टचा मोलाचा वाटा आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/10/image-212.png)
‘स्त्री २’ पासून श्रद्धा कपूरच्या फॅन फॉलोइंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, श्रद्धाच्या प्रोफेशनल लाईफपासून ते तिच्या पर्सनल लाईफपर्यंत(life partner) चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. एका मुलाखतीत श्रद्धाने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला आहे.
नुकतीच श्रद्धा कपूरने एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीत तिने रिलेशनशिपबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. लग्नाबद्दल बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली की, लग्नाचा निर्णय उत्तम जोडीदारावर अवलंबून असतो. मला माझ्या लाईफ पार्टनरसोबत वेळ घालवायला खूप आवडेल. या गोष्टींसोबतच तिने रिलेशनशिपबाबत काही सूचनाही दिल्या आहेत.
श्रद्धा कपूरने सांगितले की, परीकथेतल्या लव्हस्टोरी मला खूप आकर्षित करते. जोपर्यंत ती जोडीदारासोबत(life partner) आहे, तोपर्यंत तिला इतर कोणाचीही गरज नाही, असेही तिने सांगितले. कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या जोडीदाराचे नाव न घेता बोलले. तिच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याबद्दल श्रद्धाने सांगितलं की, मला माझ्या जोडीदारासोबत वेळ घालवायला खूप आवडते, मला चित्रपट पाहणे, डिनर डेटसाठी बाहेर जाणे आणि त्याच्यासोबत प्रवास करणे आवडेल.
मुलाखतीदरम्यान जेव्हा श्रद्धाला लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिला लग्नाबाबत आजच्या पिढीबद्दलही विचारण्यात आले. यावर श्रद्धा म्हणाली की लग्नासाठी योग्य जोडीदारच असायला हवा. सध्याच्या पिढीबाबत तिने सांगितले की, काही लोकांना लग्न करायचे नसते, ते त्यांच्या जागी बरोबर असतात. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा राहुल मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, या वृत्ताला दोघांनीही अद्याप दुजोरा दिलेला नाही.
हेही वाचा:
बाबा सिद्दिकी यांची हत्या घटना एक, प्रश्न अनेक!
विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारचं मोठं गिफ्ट
‘गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर…’ मुश्रीफ कडाडले!