सपोर्ट स्टाफसाठी रोहित शर्माचा मोठा निर्णय…

टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघावर पैशांचा (Rohit Sharma)आणि बक्षिसांचा मोठा वर्षाव झाला. आयसीसीकडून 20.4 कोटी, तर बीसीसीआयकडून 125 कोटी रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात आली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेपैकी 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील. यात सर्वात मोठा वाटा होता तो टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंचा. पण प्राईज मनी वाटपात रोहित शर्माने एक असा निर्णय घेतला ज्याने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकलीत.

मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआयने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपायांचं वाटप होत असताना रोहित शर्माने संघाच्या सपोर्ट स्टाफसाठी स्वत:चा बोनस सोडण्याचा निर्णय घेतला. सपोर्ट स्टाफलाही चांगला पैसा मिळावा यासाठी त्याने हा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या 15 खेळाडूंना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना 2.5 कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय राखीव खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात आले. पण यात सपोर्ट स्टाफला कमी पैसे मिळाल्याचं रोहित शर्माच्या(Rohit Sharma) लक्षात आलं.

या विरोधात रोहित शर्माने आवाज उठवला. टीम इंडियाच्या विजयात सपोर्ट स्टाफचाही तितकाच मोलाचा वाटा आहे, त्यांना कमी पैसे मिळता कामा नयेत, यासाठी आपण आपला बोनस सोडण्यास तयार असल्याचं रोहित शर्माने म्हटलं. रोहितच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय.

मिळालेल्या माहितीनसुटी टीम इंडियातल्या 15 खेळाडूंना प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळाले. याशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रवडि, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यंना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये प्राईज मनी देण्यात आलं. राहुल द्रविड यांना पाच कोटी रुपये देण्यात येणार होते, पण आपल्या इतर कोचिंग स्टाफ इतकेच पैसे आपल्याला देण्यात यावेत अशी विनंती त्यांनी बीसीसीआयकडे केली होती.

याशिवाय भारतीय संघाचे तीन फिजिओ, तीन थ्रो डाऊन स्पेशलिस्ट, दोन मसाज थेरेपिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यांनाही प्रत्येकी 2 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. तर पाच सदस्यीय निवड समितीला प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात आले. या स्पर्धेसाठी चार राखीव खेळाडूंची निवड होणार होती. त्यांनाही प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षीस मिळालं. व्हिडिओ अॅनालिस्ट, बीसीसीआयचे इतर स्टाफ मेंबर्सनाही प्राईज मनीचा हिस्सा मिळणार आहे.

हेही वाचा :

शिवसेना ठाकरे गटाचा मास्टर प्लान…

‘जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर…’, केतकी चितळेची मराठ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट

सांगली: प्रतापसिंह उद्यानात पक्ष्यांचे विश्व उलगडणारे पक्षी संग्रहालय लवकरच खुले होणार