मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas

आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 7 फेब्रुवारीपासून हा(propose) प्रेमाचा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यातील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. हा प्रपोज डे आता काही दूर राहिला नाही. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा प्रेमाचा दिवस अनेक कपल्सना एकत्र जोडण्याचे काम करतो तसेच आधीपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोडप्यांचे नाते आणखीन घट्ट करण्यासही मदत करतो. अनेकजण या दिवशी आपल्या प्रेमाच्या कबुली देतात आणि मोकळेपणाने आपल्या भावना आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात.

आता तुम्हीही प्रपोज डे निमित्त काही खास करण्याचा विचार केला असेल पण नक्की काय करावं ते सुचत नसेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीला हलक्या अंदाजात प्रपोज करण्यासाठीच्या काही हटके आयडियाज सांगणार आहोत. यांच्या मदतीने तुम्ही अनोख्या अंदाजात आपल्या प्रेमाच्या भावना तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता.

रोमँटिक डिनर प्रपोजल
जर तुम्हाला सुंदर आणि एलिगंट अंदाजात आपल्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर रोमॅंटिक डिनर एक उत्तम पार्याय ठरू शकते. यासाठी तुम्ही एका छानशा हॉटेलात स्पेशल बुकिंग करू शकता. आजकाल बरेच हॉटेल कपल्ससाठी स्पेशल डिनर प्लॅन्स बनवतात ज्यात सुंदर सजवलेला (propose)टेबल आणि रोमँटिक म्युजिकची जोड दिली जाते. या सर्व गोष्टी आजूबाजूचे वातावरण रोमँटिक बनवण्यास मदत करतात. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीचे फूड देखील ऑर्डर करून त्यांना खुश करू शकता.

थोडा कुकिंग-शुकिंग
तुम्हाला कुकिंगची आवड असेल आणि तुमचा पार्टनर जर फुडी असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक चविष्ट असा पदार्थ तयार करू शकता. तुम्ही या पदार्थाला हार्ट शेप देऊन किंवा त्यावर तुमच्या जोडीदाराच्या नावाचे अक्षर बनवून याला एक सुंदर रूप देऊ शकता. तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी घेतलेले हे एफर्टस पाहून नक्कीच तुमचा पार्टनर तुमच्यावर खुश होईल.

हँडमेड गिफ्ट्स
तुम्हाला तुमच्या भेटवस्तूमध्ये थोडा पर्सनल टच जोडायचा असेल तर, हाताने बनवलेल्या भेटवस्तू हा एक उत्तम पर्याय असू शकतो.जसे की तुमच्या जुन्या आठवणी आणि(propose) फोटो असलेले DIY स्क्रॅपबुकहँडमेड कार्ड ज्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता

लॉंग डिस्टन्स प्रपोजल
जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीपासून दूर राहत असाल आणि तुम्हाला न भेटता जर त्याच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओचा पर्याय निवडू शकता. यासाठी फार काही करण्याची गरज नाही फक्त एका शांत आणि सुंदर ठिकाणी स्वतःचा व्हिडिओ शूट करा आणि आपल्या मनातील सर्व भावना यात व्यक्त करा. तुम्ही यावेळी तुमचे प्रेम व्यक्त करताना शायरी किंवा गाणं देखील म्हणू शकता, याने समोरचा व्यक्ती नाक्कीच तुमच्यावर इम्प्रेस होईल.

हेही वाचा :

कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्या बंद करा, अन्यथा…; अजित पवारांनी भरला दम

BSNL च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; कंपनीने आणले सर्वात स्वस्त प्लॅन

रांझा तेरा हीरिये: व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार नवीन रोमँटिक गाणं