महिलांनी स्वत:चं नाव कसं लिहायचं? महाराष्ट्र शासन लवकरच आणणार नवा जीआर

महाराष्ट्रात 2024 च्या मे महिन्यापासून सर्व शासकीय कागदपत्रांवर आपल्या नावासोबतच आईचं(women) नाव लावणं बंधनकारक करण्यात आलं. आपल्या नावानंतर आधी आईचे, मग वडिलांचे आणि नंतर आडनाव लिहिण्याची पद्धत रुजू झाली. पण, कैक महिलांना त्याबाबत अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला.

याच कारणास्तव राज्य सरकारने स्पष्टता आणावी, अशी मागणी अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक यांनी विधानसभेत केली. विधानसभेच्या सध्या सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरण्यात आला. ज्यानंतर यासंदर्भात अधिक सुस्पष्ट शासन निर्णय काढला जाणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.

स्वत:चा अनुभव सांगताना सना मलिक म्हणाल्या, ‘माझ्या नावानंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव असं पूर्वीपासून मी लिहित आले. लग्नानंतर माझ्या नावानंतर पतीचं नाव, त्यांचे आडनाव असे लिहू लागले. यानंतर आता मध्येच आईचं नाव लिहिण्याची पद्धत आली. त्यामुळं नावात नेमकं काय काय लिहावे, हा प्रश्न मला पडला’. आईच्या नावानंतर पतीचे नाव आणि त्यांचेच आडनाव लिहावं लागतं असं म्हणत त्यांनी महत्त्वाचा मुद्दा समाभगृहापुढे मांडला.

महिलांना(women) नाव नेमकं कस लिहावं यासंदर्भात आता शासनाकडून जीआर काढत त्यामध्ये नेमकं काय नमूद केलं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ज्यावेळी शासकीय कागदपत्रांमध्ये संपूर्ण नाव लिहिताना आईच्या नावाचा समावेश बंधनकारक करण्यात आला पण, प्रत्यक्षात महाराष्ट्रात ही सुरुवात नेमकी कधीपासून झाली होती माहितीये?

1994 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना पहिलं महिला धोरण अस्तित्त्वात आलं होतं. पुढे 1999 मध्ये काँग्रेसचं सरकार येऊन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं दुसरं धोरण आणलं. त्याआधी 11 नोव्हेंबर 1999 ला विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात कागदपत्रांवर आईचं नाव लिहिण्याचा निर्णय बंधनकारक करण्यात आला होता. ज्याअंतर्गत वडिलांच्या नावाप्रमाणं आईचं नाव लिहिण्यासाठीसुद्धा स्तंभ ठेवण्यात यावा आणि तिथं आईचं नाव लिहावं असं बंधनकारक करण्यात आलं होतं.

शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, जन्ममृत्यू, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची नोंदणी अशा सर्व कागदपत्रांमध्ये आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आलं होतं.

हेही वाचा :

१३, १४ अन् १५ मार्चला बँकांना सुट्टी

आता 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार; पण जुन्या नोटा…

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

आनंदवार्ता! होळीत महागाईचे दहन, सोने-चांदीत स्वस्ताई, किंमती झाल्या कमी