कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शरद पवार यांच्या “लोक माझे सांगाती”या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन वाय बी सेंटर मध्ये झाल्यानंतर, त्याच कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या(political news todays) राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा घोषित करून तो अवघ्या 36 तासात मागे घेतल्यानंतर, शरद पवार हे त्यांच्याच पक्षात सर्वोच्च आणि बलवान नेते बनले. “अजून तारुण्यात मी” हा संदेश त्यांनी तेव्हा दिला.
त्यानंतर अवघ्या काही दिवसात, नेमकी तारीखच सांगायची तर दिनांक 3 जुलै 2023 रोजी अजितदादा पवार हे 40 आमदार सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले. हा त्यांच्यासाठी मोठ्या तीव्रतेचा राजाकीय भूकंप होता. पण त्यानंतर उरल्या सुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा म्हणून स्वतःलाच घोषित केलेल्या शरद पवार यांचा चेहरा विधानसभा निवडणूक निकालानंतर अगदी म्लान झाला आहे. पुन्हा पुरुन,उरेन मी हा त्यांचा निर्धारही कोलमडून पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (political news todays)पक्ष हा घड्याळ या निवडणूक चिन्हासह त्यांच्या हातातून निघून गेल्यानंतर त्यांना एका पत्रकारांनी उरल्या सुरल्या राष्ट्रवादीसाठी आता आश्वासक चेहरा कोण आहे असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी मीच आश्वासक चेहरा असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी त्यांचे सहकारी असेच सोडून गेले होते याचा दाखला दिला. इतकेच नाही तर मला सोडून गेलेले नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते आताही अजितदादांसह मला सोडून गेलेले पुन्हा निवडून येणार नाहीत असे त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचे होते. पुन्हा आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. पक्षाची बांधणी पुन्हा नव्याने करू असा आत्मविश्वास दाखवून ते पुन्हा पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरत होते.
लोकसभा निवडणुकीत त्यांचे आठ हजार निवडून आले. ते नेतृत्व करत असलेल्या महाविकास आघाडीने ही या निवडणुकीत चांगला स्ट्राइक रेट मिळवला. महायुतीची विशेषता भाजपची चांगलीच घसरण झाली. आणि मग शरद पवार यांचा आत्मविश्वास वाढला. आता विधानसभा निवडणुकीतही भाजप प्रणित महायुतीला सत्तेतून पायउतार व्हायला लावू. परिवर्तन घडवू. आणि इथल्या अपयशाचा प्रत्येक कोण परिणाम एन डी ए वर होऊन नरेंद्र मोदी सरकार कोसळेल अशी राजकीय स्वप्ने पाहणाऱ्या पवारांनी या विद्यमान सरकारला खाली खेचल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही असे सांगून टाकले. त्यांना कोणी “या वयातही”असा उल्लेख केलेला आवडत नाही. आता मात्र महायुतीचे सरकार कोसळलेले नाही, उलट ते अधिक भक्कम झाले आहे. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हातारा झालो आहे असे सांगून टाकले आहे.
जेव्हा त्यांचे 70 पेक्षा अधिक सहकारी त्यांना सोडून गेले तेव्हा त्यांचे वय 38 होते. त्यानंतर दीर्घ दोन वर्षांपूर्वी त्यांचे चाळीस सहकारी त्यांना सोडून गेले तेव्हा त्यांचे वय 80 च्या पुढे होते. आज ते 84 वर्षात आहेत. तारुण्यात पक्ष वाढवणे हे त्यांच्यासाठी सोपे होते आता 80 क्रॉस झाल्यानंतर पुन्हा पक्षाची बांधणी करणे हे त्यांना शक्य नव्हते आणि नाही.
विधानसभा निवडणुकीत त्यांचे फक्त दहा उमेदवार विजयी झाले आहेत, त्यातील काही जण काठावर पास झालेले आहेत. हे असे का घडले याचे आत्मचिंतन करण्याऐवजी त्यांनी या दारुण पराभवाचे खापर उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे ईव्हीएम मशीन वर फोडले आहे. पराभव का झाला याची काही कारणे सांगावी लागतात. त्यांनी ईव्हीएम मशीन हे कारण शोधून काढले आहे.
दिड दोन वर्षांपूर्वी त्यांनी वाय बी चव्हाण सेंटर मध्ये अचानकपणे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आपली निवृत्ती मागेही घेतली. हे सर्व त्यांनी अगदी नियोजनपूर्वक ठरवून केले होते हे नंतर अजित दादा पवार यांनीच उघड केले. त्यांना पक्षांमध्ये माझ्या इतका मोठा कोणीही नाही असा संदेश द्यावयाचा होता. त्यांनी अनेकदा आता भाकरी फिरवावी लागणार असे सांगून अनेकांच्या पायात साप सोडला होता. प्रत्यक्षात मात्र भाकरीवर केवळ हात फिरवला, भाकरी फिरवलीच नाही.
विधानसभा निवडणुकीत(political news todays) त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत आता कुठेतरी थांबावे लागेल असे सांगून आपल्या मनात आता राजकीय निवृत्तीचे विचार आहेत असे संकेत दिले होते. त्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर, राज्यसभेची अजून माझी दीड वर्षे शिल्लक आहेत. त्यानंतर विचार करू. राजकीय निवृत्ती सध्या तरी आपल्या मनात नाही असे सांगून यू टर्न घेतला होता. त्यांची वैचारिक बैठक कुठेतरी हरवत चालली होती. अल्पमतात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची त्यांची भूमिका हे त्याचेच प्रतीक होते.
2019 मध्येही आम्हाला जनतेने विरोधी बाकड्यावर बसण्याचा कौल दिला आहे असे सांगत फिरणाऱ्या शरद पवार यांनी महा विकास आघाडीची मोट बांधली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. हा सुद्धा त्यांच्या वैचारिक बैठकीचा घोळच होता. अजित दादा पवार यांनी गौप्य स्फोट करायचे आणि नंतर असे काही घडलेच नाही. ते असत्य बोलतात असा खुलासा करायचा. एकूणच गेल्या काही वर्षांपासून त्यांचे राजकारण त्यांच्याच हातातून हळूहळू निसटत गेले. त्यांच्या राजकारणाची विश्वासार्हता सुद्धा कमी होत गेली. म्हणूनच त्यांनी आता कुठेतरी थांबले पाहिजे हे त्यांचेच वाक्य त्यांना सांगितले पाहिजे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले…
हाडं गोठवणारी थंडी वीकेंड गाजवणार; राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी?
काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीचा पराभव; ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप