वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीमध्ये 2 ते 29 जूनदरम्यान टी-20 क्रिकेट(t 20 cricket) वर्ल्ड कपचा ‘रन’संग्राम रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी अवघे तीन दिवस उरल्याने सर्वच संघांची आता अंतिम तयारी सुरू झाली आहे. हिंदुस्थानी संघातील बहुतांश खेळाडू न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले असून ‘हम भी है जोश में’ हे दाखविण्यासाठी आता त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.
हिंदुस्थानमध्ये आयपीएलचा महोत्सव 26 मेपर्यंत रंगला. त्यामुळे हिंदुस्थानी संघ थोडा उशिराने अमेरिकेत दाखल झाला. टीम इंडियाचा पहिला जथा 25 जूनला, तर दुसरा जथा 28 जूनला मायदेशातून न्यूयॉर्कला रवाना झाला. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी आता हळूहळू सरावाला सुरुवात केली आहे. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या खेळाडूंचा सराव करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून आम्ही टी-20 वर्ल्ड(t 20 cricket) कपसाठी सज्ज असल्याचा इशारा क्रिकेट जगताला दिला आहे. आयपीएलमुळे हिंदुस्थानी क्रिकेटपटू तब्बल अडीच महिने वेगवेगळय़ा फ्रेंचाईजी संघात विखुरलेले होते. आता टीम इंडियाच्या रूपाने या खेळाडूंची मोर्चेबांधवणी करण्याचे मोठे आव्हान प्रशिक्षक राहुल द्रविड व इतर सपोर्ट स्टाफवर असेल. कारण इतर संघांनी खूप आधी वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे.
टीम इंडियाचे स्ट्रेंथ अॅण्ड पंडिशनिंग कोच सोहम देसाई यांनी खेळाडूंनी अमेरिकेतील वातावरणाशी लवकर जुळवून घेण्यासाठी काय करायला हवे याचे मार्गदर्शन केले. तब्बल अडीच महिने टीम इंडियातील सर्व क्रिकेटपटू आयपीएलमध्ये मग्न होते. या सर्वांना त्या माहोलमधून बाहेर काढून टी-20 वर्ल्ड कपसाठी मानसिकदृष्टय़ा तयार करण्याचे आव्हान आमच्यापुढे असेल, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
टीम इंडियाचा सराव सामना बांगलादेशशी
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा एकमेव सराव सामना 1 जूनला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सराव सामना न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे. त्यानंतर 5 जूनला हिंदुस्थानी संघ आयर्लंडविरुद्धच्या लढतीने आपल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अभियांनाचा श्रीगणेशा करणार आहे.
रोहित, पंडय़ाचा एकत्र सराव
‘बीसीसीआय’ने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार हार्दिक पंडय़ा एकत्र सराव करताना दिसत आहेत. पंडय़ा आयपीएलनंतर लंडनला गेला होता. आता तो न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियात दाखल झाला आहे. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व रवीद्र जाडेजा व्यायाम करताना दिसले. खेळाडूंनी काही काळ फुटबॉल खेळण्याचाही आनंद लुटला, मात्र स्टार फलंदाज विराट कोहली अद्यापि मायदेशात आहे. आयपीएलनंतर त्याने एक छोटी विश्रांती घेतली असून 30 किंवा 31 मे रोजी तोही न्यूयॉर्कमध्ये संघात दाखल होईल. युवा सलामीवीर शुभमन गिलनेही बुधवारी सराव केला. ‘अमेरिकेत आम्ही कधीच क्रिकेट खेळलेलो नाहीये. आज प्रथमच आम्ही टीम ऑक्टिव्हीटीसाठी मैदानावर उतरलोय,’ असे गिलने सांगितले.
हेही वाचा :
इचलकरंजीत विजेच्या धक्क्याने शोरूममधील कर्मचाऱ्याचा मृत्यू
करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला…
कोल्हापूरात वाढला टक्का, कोणाला बसणार धक्का, लोकसभेच्या आडून विधानसभेवर नजर