पती-पत्नी और वो…आता काय फुल ऑन राडा! पत्नीने पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले Video Viral

सोशल मीडियावर (social media)नुकताच धक्कादायक पण तितकाच मनोरंजक असा एक प्रकार व्हायरल झाला आहे. तुम्ही टीव्ही सिरीयलमध्ये अथवा चित्रपटांमध्ये ‘पती-पत्नी और वो’ हे समीकरण बऱ्याचदा पाहिले असेल मात्र हे दृश्ये प्रत्यक्षात तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेल तर आता तुम्हाला ते व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील झाशी येथे घडून आली आहे, जिथे एका पत्नीने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसह भररस्त्यात रंगेहाथ पकडल्याचे दिसून येत आहे. यानंतर काय घडले ते जाणून घेऊयात.

झाशीतील एका घटनेने (social media)सोशल मीडियावर धुमाकूळ माजवली आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण हैराण झाले आहेत आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील करत आहेत. यात पतीला प्रेयसीसोबत पाहून पत्नीचा संयम सुटल्याचे दिसून आले आणि यानंतर तिने जे केले ते पाहून सर्वच हादरून गेले.

असे म्हणतात की, स्त्रिया या रणरागिणीचे प्रतीक असतात, अशात त्यांना दुखवल्यास तुम्हाला ते किती महागात पडू शकते याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो मात्र आताच्या या जगात जोडपे आपल्या नात्यात या गोष्टी कुठेतरी हरवत आहेत. असेच काहीसे या व्हायरल व्हिडिओतही घडल्याचे दिसून आले आहे.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, यात पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच शिवीगाळ करत चोप दिल्याचे दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी पत्नीने खूप गोंधळ घातला आणि रागाच्या भरात पतीला थप्पडही मारली.

मिळालेल्या माहितीनुसार, पती अनेक दिवसांपासून घरातून बेपत्ता होता आणि पत्नी सतत त्याचा पाठलाग करत होती. यावेळी बीकेडी चौकात पत्नीने पतीला दुसऱ्या मुलीसोबत पाहिल्याने ती दोघांवर भडकली आणि भररस्त्यात त्यांना मारहाण करू लागली.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @ ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केले गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पत्नीने पतीला प्रेयसीसोबत रंगेहात पकडले, प्रेयसी आणि पत्नीमध्ये जोरदार मारामारी, पतीलाही मारहाण झाली’ असे लिहिण्यात आले आहे.

व्हिडिओवर काहींनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही दोघींनी शिव मंदिरात जाऊन पूजा आणि आरती केलीत तर सर्व काही ठीक होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता बोला तलाक, तलाक, तलाक”.

This image has an empty alt attribute; its file name is image-374-1024x1024.png

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

हेही वाचा :

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल अन्न उत्सवाचे आयोजन

CV ठेवा तयार! देशातील ‘या’ नामांकित कंपनीत 10 ते 12 हजार उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण