महाशिवरात्रीनिमित्त एक धक्कादायक घटना घडली आहे. महाशिवरात्रीच्या (Husband)मिरवणुकीत पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. याच भांडणातून पतीने पत्नीचे दातांनी नाक चावले आहे. यामुळे ती रक्तबंबाळ झाली. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी कैसरगंज पोलिस ठाण्याच्या देवलखा चौकात घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाशिवरात्री उत्सवानिमित्त गावातील देवळखा चौकातून शिव मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक बुधवारी निघाली होती. यादरम्यान चौकात प्रचंड गर्दी जमली होती. पती पत्नी आणि त्यांची मुले मिरवणुकीत गेले होते. मुलं गर्दीत गेली. त्यानंतर मुलांना बोलावण्यासाठी त्यांची आई पाठोपाठ(Husband) गेली.याच गोष्टीचा मनात राग धरून पती आणि पत्नीमध्ये भांडण झालं. पतीला राग अनावर झाला. त्याने थेट पत्नीच्या नाकाचा चावा दातांनी घेतला. त्याने भररस्त्यात जोरात नाकाचा चावा घेतला. यामुळे ती रक्तबंबाळ झाली. नाकातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.
महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर, तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी पती पत्नीमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. नंतर महिलेला (Husband)तातडीने खासगी रुग्णालयात पाठवले. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत कैसरगंजचे एसएचओ हरेंद्र मिश्रा म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
‘महिलेच्या गालाला, शरिराला हात लावणं म्हणजे…’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
भारतीय संघ अडचणीत, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार बदलणार?
राणीसारखं आयुष्य जगतेय प्रियांका चोप्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल