पती- पत्नी आणि अनैतिक प्रेमसंबंध याच्यावर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. मात्र खऱ्या आयुष्यातदेखील असे प्रसंग घडत असतात. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात हा प्रसंग घडला आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या गैरहजेरीत तिच्याच बहिणीसोबत लग्न(married) केले आहे. त्यानंतर त्याने पत्नीला व्हिडिओ कॉल करुन असं काही सांगितली की तिच्या पायाखालची जमिनच हादरली.

मेहुणीसोबत लग्न(married) केल्यानंतर पतीने पत्नीला व्हिडिओ कॉल करत आता घरी येण्याची गरज नाही, असं सांगितलं. हे ऐकल्यानंतरच पत्नीला मोठा धक्का बसला आहे. पत्नीला हे एकताच संताप अनावर झाला आणि ती नातेवाईकांना घेऊन घरी गेली. मात्र पतीने तिला घरात येऊच दिले नाही. त्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी जेव्हा पतीला पोलीस ठाण्यात बोलवले तेव्हा त्याने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली. पोलिस या प्रकरणात तपास करत असून पती आणि पत्नी दोघांचीही चौकशी करत आहेत.
ही घटना बार्शीटाकळी तालुक्यातील विजोरा गावातील आहे. येथे राहणाऱ्या सूरज तायडेने 9 महिन्यांपूर्वी कोमलसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर कोमल शिक्षण पूर्ण करत होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला परीक्षा देण्यासाठी अमरावतीला जावे लागले. परीक्षा संपल्यानंतर कोमल जेव्हा घरी परतण्याची तयारी करत होती तेव्हा तिला पतीने व्हिडिओ कॉल केला आणि म्हटलं की आता तुला घरी येण्याची गरज नाही मी तुझ्यासोबत राहू शकत नाही.
पत्नीने जेव्हा तिच्या कुटुंबीयांना याबद्दल सांगितले तेव्हा ते सर्व तिच्या पतीच्या घरी पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी पाहिलं की, तिच्या पतीने तिच्याच काकांच्या मुलीसोबत लग्न केले. हे पाहून संपूर्ण कुटुंबाचा राग अनावर झाला. मात्र सूरजने कोणालाही घरात येऊ दिलं नाही. त्यानंतर पत्नीने थेट पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना सर्व घटना सांगितले.
पोलिसांनी सूरजला ठाण्यात बोलवल्यानंतर सूरज त्याच्या नवीन पत्नीसह पोलीस ठाण्यात गेला होता. त्यानंतर रागात असलेल्या कोमलने दोघांनाही मारायला सुरुवात केली. कोमलने पतीला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर शेवटी पोलिसांना मध्ये पडावं लागेल. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत असून दोन्हीकडील बाजू तपासत आहेत. आता या घटनेचे पुढे काय होईल हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा :
सकाळी ‘या’ चुका करणं टाळा, नाहीतर आयुष्यावर होईल वाईट परिणाम!
होळीच्या दिवशी सोन्याचं दरात मोठी वाढ; लगेच चेक करा
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा मोठा निर्णय