कुर्डुवाडी : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे विवाहितेच्या खात्यावर आलेले पैसे पतीने दारुवर(alcohol) खर्च केले म्हणून विवाहितेने पतीला जाब विचारला. तेव्हा सासूने विवाहितेला शिवीगाळ दमदाटी केली. तसेच विवाहितेच्या पतीने लाकडाने व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.१३) रात्री लोणी (ता.माढा) येथे घडली. याबाबत विवाहिता निशा धनाजी लोंढे यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

घरी लोणी (ता.माढा) येथे होळीचा सण साजरा होत असताना धनाजी लोंढे हा दिवसभर घरी न थांबता परंडा येथे होता. रात्री दहा वाजता दारूच्या(alcohol) नशेत घरी आला आणि बायकोला ‘तुझ्या लाडक्या बहिणीचे आलेले १५०० रुपये मी दारुमध्ये उडवले. यावर विवाहितेने पैसे का खर्च केले?’ असा जाब विचारला असता पतीने जळणातील लाकडाने विवाहितेच्या पाठीवर मांडीवर मारले.
त्यानंतर महिलेची सासू रुपाबाई शिवाजी लोंढे यांना बोलावून आपली तक्रार सांगितली. त्यावर सासूने उलट सुनेलाच शिवीगाळ करत हिला बघच असे म्हटल्यानंतर विवाहितेच्या पतीने पत्र्याच्या शेडमधील उस तोडणीचा कोयता घेऊन तुला आता दाखवितोच म्हणून कोयत्याने डाव्या पायाच्या गुडघ्यावर व डाव्या हाताच्या अंगठ्याशेजारील तर्जनीवर मारून जखमी केले व तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
दरम्यान, विवाहितेचा दीर व नणंद यांनी येऊन सदर भांडणे सोडवली. या भांडणात विवाहितेचा मुलगा ऋषीकेश हा देखील जखमी झाला आहे. याबाबत विवाहिता निशा धनाजी लोंढे यांच्या फिर्यादीवरुन पती धनाजी शिवाजी लोंढे व सासू रुपाबाई शिवाजी लोंढे यांच्यावर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
हेही वाचा :
कहाणी एका शिक्षकाची! हृदय पिळवटून टाकणारी !
महिला पोलिसाची वर्दी खेचत विनयभंग; हिंसाचार करणाऱ्यांकडून अश्लील शिविगाळ अन् चाळे
MI vs CSK सामन्यात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण? रोहित शर्माच्या नावावर फुली!