हैदराबादचे पुन्हा फटकारे; 9.4 षटकांतच गाठले 165 धावांचे लक्ष्य

हैदराबादच्या(hyderabad) फलंदाजांनी पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी गोलंदाजी आक्रमणाला चेंदामेंदा करताना धावांचा आणि षटकारांचा उत्सव साजरा केला.

ट्रव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी लखनऊच्या 166 धावांच्या आव्हानाच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवत 9.4 षटकांतच विजयी लक्ष्य बिनबाद गाठत हैदराबादला(hyderabad) गुणतालिकेत तिसऱया स्थानावर नेले. हैदराबादच्या विजयामुळे मुंबई इंडियन्स साखळीतच अधिपृतरीत्या नॉकआऊट झाला.

लखनऊनने निकोलस पूरन आणि आयुष बदोनीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या 99 धावांच्या दमदार भागीच्या जोरावर 4 बाद 165 धावा केल्या होत्या. हे आव्हान खूप कमी होते, पण हैदराबादच्या हेड आणि शर्माने पुन्हा एकदा हवाई हल्ल्यांची सलामी देताना अवघ्या 58 चेंडूंत 16 चौकार आणि 14 षटकारांची बरसात करत हे लक्ष्य गाठले आणि नवा विक्रम केला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 10 षटकांत 167 धावा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी 167 धावांपैकी 148 धावा या निव्वळ चौकार-षटकारांनीच काढल्या. म्हणजे विजयी लक्ष्यात 89 टक्के धावा या चौकार-षटकाराच्याच आहेत. हासुद्धा एक नवा विक्रमच आहे.
हैदराबादच्या षटकारबाजीमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये षटकारांनी एक हजाराचा पल्ला गाठला आहे. आयपीएलच्या इतिहासात तिसऱयांदाच हा विक्रम झाला आहे. याआधी गेल्या मोसमात सर्वाधिक 1124 षटकार ठोकले गेले होते तर 2022 साली षटकाराने हजारचा पल्ला ओलांडला होता. तेव्हा 1062 मारले गेले होते. यंदा षटकारांचा झंझावात पाहाता हा आकडा 1300 च्या पलीकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

हेडचा अनोखा विक्रम

हेडचा झंझावात इतका भयंकर होता की, त्याने 16 व्या चेंडूंवर नवीनुल हकला षटकार ठोकत आपली पन्नाशी गाठली. विशेष म्हणजे या खेळीत त्याने सर्व धावा षटकार आणि चौकारांनीच काढल्या. त्याने 5 षटकार आणि 5 चौकार ठोकले आणि उर्वरित सहाही चेंडू निर्धाव गेले होते. मात्र पुढील 14 चेंडूंत त्याने 3-3 षटकार-चौकार खेचत 39 धावा काढल्या. त्याच्या या खेळीत 80 धावा चौकार-षटकारानेच निघाल्या होत्या. आजच्या खेळीमुळे हेडच्या 533 धावा झाल्या असून तो विराट कोहलीपेक्षा केवळ 9 धावा मागे आहे. शर्मानेही 19 व्या चेंडूवर आपल्या 50 धावा पूर्ण केल्या. त्याने 28 चेंडूंत पाऊणशतकी खेळी साकारली. हैदराबादने आज आपले शतक 34 धावांत पूर्ण केले.

पूरन–बदोनीने सावरले

आज लखनऊला क्विंटन डिका@क (2) आणि मार्पस स्टोईनिसने (3) निराश केले. त्यानंतर कर्णधार के. एल. राहुलने पृणाल पंडय़ाच्या साथीने पडझड रोखली. पण संघाचे अर्धशतक गाठल्यावर पॅट कमिन्सने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे 11.2 षटकांत 4 बाद 66 धावा करणाऱया लखनऊला निकोलस पूरन आणि आयुष बदोनीने 165 धावांपर्यंत नेले. पूरनने 26 चेंडूंत 48 तर बदोनीने 30 चेंडूंत 55 धावा केल्या. याच भागीमुळे लखनऊने समाधानकारक मजल मारली होती.

हेही वाचा :

मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढणार;

बायकोच्या रीलवर नेटकऱ्यांची अश्लिल कमेंट, सरकारी कर्मचाऱ्याने लाइव्ह करत उचललं टोकाचं पाऊल

कट्टर हिंदू कधीच बीफ खात नाही, कंगना रोखठोक बोलली; पोस्ट व्हायरल