काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर उमेदवारीबाबत मी इच्छुक नाही’; पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका स्पष्ट

लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीतील पराभवानंतर (Congres)काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव (Congres)काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. असे असताना आता यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. प्रदेशाध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही. सध्या ज्या काही चर्चा सुरू आहे, त्याबाबतही मला माहिती नसल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस कार्यालयाच्या उ‌द्घाटनप्रसंगी पत्रकारांनी पृथ्वीराज पृथ्वाराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाबाबत प्रश्न विचारला असता, प्रदेशाध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही. जी चर्चा सुरू आहे, ती मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

या महिन्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल की नाही, हे मला माहीत नाही, असेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या नवीन कार्यालयाबाबत बोलतात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज नव्या काँग्रेस कार्यालयाचे उ‌द्घाटन होत आहे, त्याचा आनंद आहे. अकबर रोडवरील कार्यालयाला मोठा इतिहास आहे.

दरम्यान, विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद दिसून येते आहे. काही नेते अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांना जबाबदार ठरवत असून, त्यांना हटवण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार आल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मोठे यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता काँग्रेस अंतर्गत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. या पदासाठी विश्वजीत कदम, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. महिलांना संधी मिळाली तर चांगलंच आहे.

विधानसभा निकालानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे यापूर्वीच सोपवला आहे. त्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे.

यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित देशमुख या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, आमदार सतेज पाटील यांनी या पदासाठी आपण असमर्थता दर्शवल्याची माहिती दिली जात आहे.

हेही वाचा :

शुभ योग; 3 राशींचं नशीब पालटणार, घडणार अचंबित घटना

तडफडून मरण पावले नाग, मृत्यूचा थरार पाहत राहिली नागीण; हृदयद्रावक Video Viral

या प्रकारची रत्न परिधान केल्यास करिअरला मिळेल चालना, संकटावर कराल मात